आम आदमी पक्षाचे मत फुटले! चंदीगड महापालिकेत मुख्य उपमहपौरही भाजपाचाच

आम आदमी पक्षाचे मत फुटले! चंदीगड महापालिकेत मुख्य उपमहपौरही भाजपाचाच

चंदीगड महापालिकेच्या महापौर पदाची खुर्ची काबीज केल्यानंतर भारतीय जनता पार्टीने आता सिनीयर डेप्युटी मेअर अर्थात मुख्य उपमहापौरांच्या खुर्चीवर ही आपले वर्चस्व कायम केले आहे. भाजपाचे उमेदवार दलीप शर्मा हे मुख्य उपमहापौर निवडणुकीत विजयी ठरले आहेत. त्यांनी आम आदमी पक्षाच्या उमेदवार प्रेमलता यांचा पराभव केला आहे. विशेष म्हणजे आदमी पक्षाचे एक मत फुटल्यामुळे भाजपाला हा विजय साध्य झाला आहे.

या आधी महापौर पदाच्या निवडणुकीत आम आदमी पक्षाचे एक मत बाद ठरल्याने भाजपाचा महापौर बसला होता. या निवडणुकीत मतपत्रिका फाटल्यामुळे हे मत बाद ठरवण्यात आले होते. तर मुख्य उपमहापौरपदाच्या निवडणुकीत भाजपाच्या पारड्यात पंधरा मते पडली आहेत. तर आम आदमी पक्षाच्या वाट्याला केवळ १३ मतेच आली आहेत.

हे ही वाचा:

पाच राज्यांच्या निवडणूक कार्यक्रमांची थोड्याचवेळात घोषणा

चंदीगड महापालिकेत पुन्हा भाजपाचाच महापौर

आशिष शेलार यांना जीवे मारण्याची धमकी

… म्हणून सोनू सूदने पंजाबचे ‘स्टेट आयकॉन’पद सोडले

या निवडणुकीत आम आदमी पक्षाला मते फुटायची भिती बहुदा आधीपासूनच जाणवत होती. त्यामुळे त्यांना ही निवडणूक गुप्त मतदान पद्धतीने न होता हात उंचावून व्हावी अशी मागणी केली होती. पण ही मागणी मान्य करण्यात आली नाही.

काही दिवसांपूर्वीच चंदीगड महापालिकेची निवडणूक पार पडली असून या निवडणुकीच्या निकालाची चर्चा देशभर होताना दिसली. ‘आप’ ने या निवडणुकीत चांगलीच मुसंडी मारलेली पाहायला मिळाली. चंदीगड महापालिकेच्या अंतिम निकालानंतर महापालिकेतील पक्षीय बलाबल हे त्रिशंकू स्थितीत नेणारे होते. भाजपाचे १४ नगरसेवक, आपचे १४ नगरसेवक अशा प्रकारचे हे बलाबल राहिले तर ७ जागा या काँग्रेस पक्षाला आणि एक जागा शिरोमणी अकाली दल या पक्षाला मिळाली.

Exit mobile version