आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी गुजरातमध्ये सत्ता स्थापन करण्याचे स्वप्न पहिले होते. यासाठी त्यांनी जोरदार प्रचार आणि सभासुद्धा घेतल्या होत्या. गुजरातमध्ये भाजपाला पराभूत करण्यासाठी आपने जोरदार प्रयत्न केले होते. मात्र, आपचा गुजरातमधील प्रवेश भाजपाला नाही तर काँग्रेसला भारी पडल्याचे दिसून येतं आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी हे भारत जोडो यात्रा करत असताना गुजरातच्या प्रचाराची जबाबदारी प्रियांका गांधी यांच्यावर होती. शेवटच्या पंधरा दिवसांमध्ये काँग्रेसने गुजरातमध्ये प्रचारसभा घेतल्या होत्या. तर आप पक्षाने गुजरातमध्ये जोरदार शक्तिप्रदर्शन केले होते. अरविंद केजरीवाल यांनी अनेक प्रचार सभा गुजरातमध्ये घेतल्या होत्या.
सभांमध्ये अरविंद केजरीवाल यांनी अनेक भाकीतं केली होती. गुजरातमध्ये २७ वर्षांचा इतिहास मोडून आप पक्षचीच सत्ता येणार. भर सभेत केजरीवाल यांनी ‘लिहून घ्या’ फक्त आपची सत्ता येणार असं, म्हटलं होत. मात्र, त्यांचं हे भाकीत खोटं ठरल्याचे दिसून आले आहे. आपने गुजरातमध्ये फक्त खातं खोलत नऊ जागांवर विजय मिळवला आहे. आपच्या गुजरात प्रवेशाचा काँग्रेसला मोठा फटका बसला असून, काँग्रेसला १९ जागांवर समाधान मानावे लागले आहे. दरम्यान, हे आकडे सातत्याने बदलत आहेत.
हे ही वाचा:
भाजपाची काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात मुसंडी
बेळगावमध्ये कन्नड रक्षण वेदिका संघटनेने महाराष्ट्रातील गाड्यांवर केला हल्ला
‘बाबासाहेबांच्या संविधानामुळेचं मी मुख्यमंत्री झालो’
पाकिस्तानशी चर्चा नाहीच, भारताची भूमिका
भाजपाने गुजरातमध्ये १५१ जागांवर विजय मिळवत स्वतःचाचं २००२ चा विक्रम मोडीत काढला आहे. गुजरातमध्ये भाजपा कार्यकर्त्यांनी विजय साजरा करण्यास सुरुवात केली आहे. गुजरातमध्ये भाजपाशिवाय कोणाचंच भविष्य नाही, असं कार्यकर्त्यांनी मतं व्यक्त केलं आहे. दरम्यान, हिमाचल प्रदेशमध्ये भाजपा आणि काँग्रेसमध्ये चुरशीची लढाई दिसून येतं आहे.