कोकणपूत्र नारायण राणे यांनी पुन्हा एकदा आपली ताकद दाखवून दिली आहे. नारायण राणे यांनी वेंगुर्ला पालिकेत महाविकास आघाडीला धूळ चारली आहे. राणे यांच्या पुढाकाराने वेंगुर्ला नगरपालिकेत भाजपाचा झेंडा फडकला आहे पालिकेच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपाचे कमळ फुलले आहे
वेंगुर्ला नगरपालिकेच्या उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीतर्फे शितल आंगचेकर यांना उमेदवारी देऊन रिंगणात उतरविण्यात आले होते. तर त्यांच्या विरुद्ध काँग्रेस पक्षाचे नगरसेवक विधाता सावंत यांना उमेदवारी देण्यात आली होती. सावंत हे शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांच्या आघाडीचे उमेदवार होते. पण असे असून देखील भाजपाच्या शितल आंगचेकर विजयी झाल्या आहेत. त्यांनी दहा विरुद्ध सात अशा मताधिक्क्याने दणदणीत विजय मिळवला आहे. त्यांच्या विजयामुळे पुन्हा एकदा तरी कोकणातले नारायण राणे यांचे वर्चस्व अधोरेखित झाले आहे.
हे ही वाचा:
गांधीनगर महापालिकेत भाजपाच सरस
राज्याच्या गृहखात्यावर कशाचा ‘अंमल’ आहे?
ईडीसमोर हजर राहण्यासाठी भावना गवळींना हवे अजून १५ दिवस!
मुंबई पालिका म्हणतेय, छट्, तिसरी लाट वगैरे काही येणार नाही!
वेंगुर्ला येथील काँग्रेसचे नेते विलास गावडे यांचे कट्टर समर्थक असलेले विधाता सावंत यांना महाविकास आघाडीने रिंगणात उतरवले होते. यासाठी काँग्रेसचे गटनेते प्रकाश डिचोलकर यांनी व्हीप सुद्धा जारी केलेला दिसला. पण या व्हीपला अनेक नगरसेवकांनी केराची टोपली दाखवली. हे नगरसेवक काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले असले तरी सध्या भाजपा सोबत आहेत. नगरपरिषदेतील हा पराभव काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जात आहे.
नारायण राणे यांनी काँग्रेसला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर वेंगुर्ला नगरपालिकेतील राणे समर्थक नगरसेवक हे भाजपाच्या वळचणीला जाऊन बसले आहेत. त्यामुळेच या नगरपालिकेत काँग्रेसला धक्का देत भाजपाने उपनगराध्यक्ष पदावर कब्जा केला आहे. या आधी थेट नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीतपण भाजपाचेच उमेदवार राजन गिरप हे नगराध्यक्ष म्हणून निवडून आले होते.