गुजरातमध्ये ग्रामीण भागातही भाजपाला घवघवीत यश

गुजरातमध्ये ग्रामीण भागातही भाजपाला घवघवीत यश

गुजरातमध्ये झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांचे निकाल हाती आले आहेत. यामध्ये पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीला घवघवीत यश मिळाले आहे. काँग्रेस पक्ष फार मोठ्या अंतराने दुसऱ्या क्रमांकावर आहे तर आम आदमी पार्टी आणि असदुद्दीन ओवैसींची एमआयएम यांनाही काही जागा मिळाल्या आहेत.

आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार ३१ जिल्हापरिषदांपैकी सर्वच्या सर्व जिल्हापरिषदांमध्ये भाजपाला सत्ता मिळाली आहे. ८१ नगर पालिकांपैकी ७५ मध्ये भाजपा ४ मध्ये  काँग्रेस तर २ मध्ये इतर पक्षांना सत्ता मिळाली आहे. याशिवाय तालूका पंचायतींमध्येही भाजपाला यश मिळाले आहे. २३१ तालूका पंचायतींपैकी १९८ वर भाजपा तर ३३ वर काँग्रेसची सत्ता आली आहे.

हे ही वाचा:

गुजरात महापालिका निवडणुकांमध्ये भाजपाला घवघवीत यश

फेब्रुवारी महिन्याच्या शेवटी सहा शहरांच्या महानगरपालिका निवडणुकांमध्ये भाजपाला अशाच पद्धतीने घवघवीत अशा मिळाले होते. भाजपा हा पारंपारिकरित्या शहरी भागातला पक्ष मानला जातो. परंतु आजच्या गुजरातमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निकालातून हे सिद्ध होतं की भाजपाचा विस्तार हा तळागाळापर्यंत झालेला आहे. फेब्रुवारीमध्ये झालेल्या महानगरपालिकांमध्ये भाजपाला सर्व महानगर पालिकांमध्ये सत्ता मिळाली होती. सर्व महानगरपालिकांमध्ये प्रचंड बहुमतही मिळालं होतं. मुख्यमंत्री विजय रूपाणी यांच्या राजकोटमध्ये तर ७२ पैकी ६८ जागा भाजपाला मिळाल्या होत्या.

Exit mobile version