गुजरात महापालिका निवडणुकांमध्ये भाजपाला घवघवीत यश

गुजरात महापालिका निवडणुकांमध्ये भाजपाला घवघवीत यश

गुजरातमधील सहा महापालिकांच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष आघाडीवर आहे. गुजरातमधील वडोदरा, अहमदाबाद, जामनगर, राजकोट, सूरत आणि भावनगर या सहा महापालिकांमधील निवडणुकांचे निकाल लागले आहेत. गुजरातमधील या सहा महापालिकांमधील ५७४ वॉर्ड्समध्ये निवडणूक झाल्या. यापैकी आत्तापर्यंत ४४६ जागांचे निकाल हाती आले आहेत. त्यातील ३८९ जागांवर भाजपाला विजय मिळाला आहे. काँग्रेस पक्षाला केवळ ३९ जागांवर समाधान मानावे लागले आहे. तर १८ जागांवर इतर पक्षांना यश मिळाले आहे.

गुजरातमधील सर्वात मोठी महानगरपालिका असलेल्या अहमदाबाद महानगरपालिकेमधील १९२ पैकी ११७ जागांचे निकाल हाती आले आहेत,यापैकी १०१ जागांवर भाजपाला विजय मिळाला आहे. काँग्रेस पक्षाला १५ तर इतर पक्षांना एका जागेवर विजय मिळाला आहे. सुरतमधील १२० जागांपैकी ८८ जागांवरचे निकाल हाती आले आहेत, यापैकी ६२ जागांवर भाजपाला तर केवळ ५ जागांवर काँग्रेसला विजय मिळाला आहे, २१ जागांवर इतर पक्षांना यश मिळाले आहे.

हे ही वाचा:

भाजपा पुन्हा एकदा आपली मजबूत पकड बसवेल

वडोदरा महानगरपालिकेतील ७६ जागांपैकी ५५ जागांचे निकाल हाती आले आहेत. यापैकी ४८ जागांवर भाजपा तर ७ जागांवर काँग्रेस पक्षाला विजय मिळाला आहे. राजकोट महानगरपालिकेतील ७२ पैकी ५६ जागांचे निकाल हाती आले आहेत. या ५६ पैकी ५६ जागांवर भाजपाला विजय मिळाला आहे. भावनागरमधील ५२ पैकी ३६ जागांचे निकाल हाती आले आहेत, यापैकी ३१ जागांवर भाजपा तर ५जागांवर काँग्रेसला यश मिळाले आहे. जामनगरमधील ६४ पैकी ५२ जागांचे निकाल हाती आले आहेत, यापैकी ४३ जागांवर भाजपा, ६ जागांवर काँग्रेस तर ३ जागांवर इतर पक्षांना विजय मिळाला आहे.

Exit mobile version