त्रिपुरा स्थानिक निवडणुका
राज्य नागरी संस्थांच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्जांची छाननी केल्यानंतर, त्रिपुरामध्ये सत्ताधारी भाजपाने एकूण ३३४ जागांपैकी ११२ जागा बिनविरोध जिंकल्या आहेत, असे निवडणूक विभागाच्या अधिकाऱ्याने मंगळवारी सांगितले.
भाजपाचा बिनविरोध विजय बिशालगड, उदयपूर, मोहनपूर, रानीरबाजार, संतीरबाजार, आणि कमालपूर आणि जिरानिया नगर पंचायत या पाच नगरपालिका संस्थांमध्ये, इतर जागांसह झालेला आहे.
राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार उर्वरित २२२ जागांसाठी २५ नोव्हेंबर रोजी एकूण ७८५ उमेदवार निवडणूक लढवणार आहेत.
भाजपाचे प्रवक्ते नबेंदू भट्टाचार्य म्हणाले की त्यांच्या पक्षाला न लढता जिंकण्याची इच्छा नाही, परंतु विरोधी पक्ष उमेदवार उभे करू शकत नसल्याबद्दल त्यांना दोष देता येणार नाही असा दावा त्यांनी केला.
हे ही वाचा:
पंजाबमध्ये पुन्हा मुख्यमंत्र्यांवर सिद्धू भारी
‘मराठी एसटी कर्मचाऱ्यांबद्दल ठाकरे सरकारला आपुलकी नाही’, गोपीचंद पडळकर यांचा हल्लाबोल
नवाब मलिकांच्या अडचणी वाढणार? हर्षदा रेडकर यांची पोलीस तक्रार
९६ देश टोचणार कोव्हीशिल्ड, कोव्हॅक्सिन
“सीपीआयएमने मान्यता गमावली आहे. आम्हाला स्पर्धा न करता जिंकायचे नव्हते. मात्र, उर्वरित जागांवर आम्ही निवडणूक लढवू. सीपीएमकडे त्यांच्या अस्तित्वाच्या तक्रारींशिवाय काहीही नाही. त्यांनी त्यांच्या कार्यकाळात जे काही केले, त्यासाठी ते आमच्यावर आरोप करत आहेत.” असं ते म्हणाले.
७७० मतदान केंद्रांवर ५.९४ लाखांहून अधिक मतदारांनी त्यांचा मतदानाचा हक्क बजावण्यासाठी नोंदणी केली आहे. जाहीर झालेल्या मतदान वेळापत्रकानुसार, २८ नोव्हेंबर रोजी मतांची मोजणी केली जाईल.