देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
शनिवारी, १६ एप्रिल रोजी कोल्हापूर उत्तर विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला. या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या जयश्री जाधव यांनी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार सत्यजित कदम यांचा १९ हजार ३०७ मतांनी पराभव केला. मात्र, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या निवडणुकीवर समाधानी असल्याचे सांगितले आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, “आम्हाला मिळालेल्या मतांवर आम्ही समाधानी आहोत, अतिशय मोठ्या प्रमाणात आमच्याकडे मतदार वळलेला आहे. आम्ही वारंवार जे सांगत होतो की, जी पोकळी आहे ती आम्ही भरून काढत आहोत, ती पोकळी काही प्रमाणात काल भरून निघाल्याची दिसलेले आहे. कारण जेव्हा भाजपा आणि शिवसेना एकत्र लढलो होतो त्यापेक्षाही जास्त मते या निवडणुकीत एकट्या भाजपाला मिळाली आहेत. या निवडणुकीत ते तिथे एकत्र लढले तरी त्यांची मतं वाढलेली नाहीत आणि आताचा विजय हा त्यांचा सहानुभूतीचा आहे. त्यामुळे २०२४ मध्ये कोल्हापुरातील ही जागा आम्ही १०० टक्के जिंकणार या बद्दल माझ्या मनात खात्री निर्माण झाली असल्याचे फडणवीस म्हणाले आहेत.
हे ही वाचा:
जेम्स लेन म्हणतो, मी बाबासाहेब पुरंदरेंशी कधीही बोललो नाही!
पत्राचाळजवळ काय होणार? भाजपाचे पोलखोल आंदोलन संध्याकाळी
‘राज ठाकरे घेणार उद्धव ठाकरेंची जागा’
दिल्ली हिंसाचाराप्रकरणी मुख्य आरोपी मोहम्मद अन्सारीसह १४ अटकेत
दरम्यान, काँग्रेसचे दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनामुळे कोल्हापूरात पोटनिवडणूक झाली. या निवडणुकीत कॉंग्रेसच्या जयश्री जाधव यांना ९७ हजार ३३२ मते तर सत्यजित कदम यांना ७८ हजार २५ मते मिळाली आहेत. जयश्री जाधव यांची ही मतं कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेनेची मिळून आहेत. मात्र, सत्यजित कदम यांची ७८ हजार २५ मतं ही फक्त एकट्या भाजपाची आहेत.