29 C
Mumbai
Saturday, January 4, 2025
घरराजकारणअब की बार, फिर से ३०० पार

अब की बार, फिर से ३०० पार

Google News Follow

Related

देशातील सर्वात मोठे राज्य असणाऱ्या उत्तर प्रदेशच्या निवडणूक २०२२ मध्ये होऊ घातली आहे. अशात सध्या उत्तर प्रदेशची सत्ता असलेल्या भारतीय जनता पार्टीतर्फे सत्ता राखण्याचा दावा केला जात आहे. भारतीय जनता पार्टीचे नेते आणि उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी हा दावा केला आहे. भाजपा पुन्हा एकदा उत्तर प्रदेशात ३०० पेक्षा अधिक जागा जिंकून सत्ता प्रस्थापित करेल असा दावा मौर्य यांनी केला आहे.

२०२१ या वर्षाचा मध्य जवळ आलेला असतानाच देशाच्या राजकीय वर्तुळात २०२२ च्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांची चर्चा सुरू झाली आहे. उत्तर प्रदेश हे देशातील लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य असून देशातील सर्वात मोठी विधानसभा या राज्यात आहे. तर लोकसभेच्या दृष्टीने सर्वाधिक खासदार हे उत्तर प्रदेशातून येतात. त्यामुळे राजकारणाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असणाऱ्या या राज्यावर सत्ता प्रस्थापित करण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष धडपडत असतात. २०१७ साली झालेल्या उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टीने अभूतपूर्व असे यश मिळवले होते. भाजपाच्या या अनपेक्षित विजयाने अनेकांना धक्का बसला होता. तर भाजपा विरोधकांचे डोळे पांढरे झाले होते.

हे ही वाचा:

फडणवीसांचे वादळ अडविण्याचा शिवसेनेचा प्रयत्न

मीरा चोप्रा लसीकरण प्रकरण, कंपनीचे कंत्राट रद्द करण्याची भाजपाची मागणी

मुंबई महापालिका निवडणुका होणार! निवडणूक आयोगाचा हिरवा कंदिल

काँग्रेस नेत्याची आता थेट भोसले राजघराण्याकडून वसूली

२०१७ सालच्या उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपाने उल्लेखनीय कामगिरी करताना ७५ टक्‍क्‍यांपेक्षा अधिक जागा जिंकत सत्ता प्रस्थापित केली होती. ४०३आमदारांच्या विधानसभेत भाजपाचे ३१२ आमदार निवडून आले होते. तर आगामी विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा त्याच प्रकारची कामगिरी करण्याचा दावा भाजपाकडून करण्यात आला आहे. भारतीय जनता पार्टी पुन्हा एकदा ३०० पेक्षा अधिक जागा जिंकत उत्तर प्रदेशमध्ये सत्ता प्रस्थापित करेल असा विश्वास भारतीय जनता पार्टीचे नेते आणि उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान भारतीय जनता पार्टीने उत्तर प्रदेश निवडणुकांसाठी संघटन बांधणी सुरू केल्याची चर्चा रंगली आहे. भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय संघटन सरचिटणीस बी.एल.संतोष यांनी सोमवारी दोन दिवसांचा उत्तर प्रदेशचा दौरा सुरू केला आहे. सोमवारी त्यांनी उत्तर प्रदेशमध्ये एक उच्चस्तरीय बैठक घेतली. या बैठकीला भाजपाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आणि उत्तर प्रदेशचे प्रभारी राधा मोहन सिंह, प्रदेशाध्यक्ष स्वतंत्र देव सिंह, उत्तर प्रदेशचे संघटन महामंत्री सुनील बंसल यांच्यासह इतर महत्त्वाचे पदाधिकारी उपस्थित होते.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
219,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा