पुण्यात १३ मे रोजी होणाऱ्या मतदानात भाजपाचे उमेदवार मुरलीअण्णा मोहोळ यांना निवडून देण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
त्यावेळी ते म्हणाले की, ही निवडणूक देशाच्या लोकसभेची निवडणूक आहे. गल्लीतला नेता नाही दिल्लीतला नेता निवडायचा आहे. लोकसभेची निवडणूक आहे. कोण देश चालवू शकतो, कोण समृद्धी आणू शकतो, सामान्यांच्या आशा आकांक्षा पूर्ण करू शकतो हे लोक ठरवणार आहे. दोन बाजू तयार झाल्या आहेत. महाभारतात एक पांडव होते एक कौरव होते. अशीच अवस्था लोकसभा निवडणुकीत आहे. एकीकडे आपली पांडवांची सेना आहे. त्यांचे नेतृत्व विकासपुरुष नरेंद्र मोदींकडे आहे. त्यांच्यासाबोत एकनाथ शिंदेंची शिवसेना, अजितदादा पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आहे. राज ठाकरेंची मनसे, पीडीपा, जनसुराज्य आहे, शिवसंग्राम आहे. लहुजी शक्ती सेना आहे, वेगवेगळ्या संघटना मिळून मोठी युती तयार झाली आहे. राहुल गांधी दुसरीकडे आहेत त्यांच्या नेतृत्वात २४ पक्षांची खिचडी आहे.
फडणवीस म्हणाले की, पण पुन्हा आपलं सरकार येणार, मोदीजी पंतप्रधान होणार. २४ पक्षांच्या खिचडीचा नेता कोण आहे? शेवटी सकाळी ९ वाजता एक पोपट टीव्हीवर येतो.. त्याला विचारलं कोण नेता? तर म्हणतो खूप नेते आहेत. पाच वर्षांत आम्ही पाच पंतप्रधान करू इतके नेते आमच्याकडे आहेत. पण पहिला पंतप्रधान कसा निवडाल, असा विचार केला तेव्हा लक्षात आलं की हे संगीत खुर्ची खेळतील. संगीत बंद झालं की, जो खुर्चीवर बसेल तो पंतप्रधान. पण ही तुमच्या परिवाराची निवडणूक नाही. परिवाराचा प्रमुख नेमायचा नाही. खासगी उद्योगाचा, व्यवासायाचा प्रमुख निवडायचा नाही. १४० कोटी लोकांचा प्रमुख निवडायचा आहे. यांचा नेता नाही, यांना नीती नाही, नियम नाही असे लोक एकत्र आले आहेत. महायुती कशी आहे. विकासाच्या गाडीसारखी.
हे ही वाचा:
“नरेंद्र मोदीचं २०२९ पर्यंत पंतप्रधानपदावर राहणार”
छत्तीसगडमध्ये १२ नक्षलवाद्यांना कंठस्नान
छत्रपती शिवाजी महाराज आणि शिवचरित्र विषयांवरील भव्य उपक्रम
ट्रकच्या धडकेत गाडी उलटी आणि बाहेर पडले सात कोटी!
मुरली अण्णा मोहोळ सामान्य घरातला आहे. पुण्याच्या महापौर पदापर्यंत पोहोचला खासदारापर्यंत पोहोचणार आहे. कोविडच्या काळात चांगले नेते घरी बसले होते तेव्हा मैदानावर उतरून मुरलीअण्णा मोहोळने काम केले आहे.
गेल्या १० वर्षांत पुण्याचे चित्र पदलले मेट्रो आली. २० हजार घरे बांधली. पाण्याची योजना होते आहे. ट्रॅफिकच्या योजना होत आहे. सर्वसामान्यांच्या जीवनात बदल होत आहेत. १० वर्षात मोदींनी चमत्कार केला. २५ कोटी गरिबांना गरिबी रेषेतून बाहेर काढले. हा विक्रम आहे.
महाराष्ट्रात निवडणुका सुरू आहेत. महाराष्ट्रातला मोसम बदलला आहे. बेमोसम पाऊस सुरू आहे. मुरलीअण्णा तुमच्यासमोरही बेमोसम लोक आहेत. हे लोक कधी येतात कधी जातात कळत नाही. पण कोणत्याही मोसमात काम करणाऱ्या लोकांनाच निवडून दिले जाते.