गोव्यात भाजपाच जिंकणार, लिहून घ्या!

गोव्यात भाजपाच जिंकणार, लिहून घ्या!

“गोव्यात भाजप पूर्ण बहुमताने सत्तेवर परतण्यास तयार आहे.” असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गुरुवारी एका कार्यक्रमाला संबोधित करताना म्हणाले. गोव्यामध्ये पुढील वर्षी फेब्रुवारी-मार्चमध्ये विधानसभेच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे.

“मी आत्तापासूनच सांगतोय लिहून ठेवा. गोव्यात भाजपा पूर्ण बहुमताने सरकार स्थापन करेल.” असं शाह म्हणाले. शाह दक्षिण गोव्यातील धारबंदोरा येथील राष्ट्रीय न्यायवैद्यक विज्ञान विद्यापीठाच्या परिसर भूमिपूजन प्रसंगी बोलत होते. गुरुवारी सकाळी गोव्यात आलेले शहा गुरुवारी संध्याकाळी तळेगावात भाजपा कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत. भाजपाचे गोवा प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी सांगितले होते की, “शहा राज्यातील विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपाच्या आमदार आणि मंत्र्यांना भेटण्याची शक्यता आहे.”

शहा यांना दिवंगत संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांचीही आठवण झाली आणि ते म्हणाले की, ते गोव्यात येऊन पर्रीकरांच्या आठवणींबद्दल बोलणार नाहीत असे होऊ शकत नाही. देश पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पर्रीकरांना युगानुयुगे लक्षात ठेवेल. मोदीजींच्या नेतृत्वाखाली पर्रीकरजींनी आमच्या तीनही सुरक्षा दलांना वन रँक वन पेन्शनची भेट दिली.” असं शहा म्हणाले.

हे ही वाचा:

अमित शाह म्हणाले पुन्हा सर्जिकल स्ट्राईक करू

लसीकरणामुळे भारतीय अर्थव्यवस्था सुसाट: आंतरराष्ट्रीय नाणेनिधी

बापरे! कोणी केली धनुष्यबाण घेऊन हत्या?

तालिबानच्या राज्यात चक्क नवरात्रौत्सव

“अनेक वर्षांपासून अतिरेकी आमच्या सीमा ओलांडत, विविध घटना घडवून आणायचे. दहशतवाद पसरवायचे आणि दिल्ली दरबार विनंतीशिवाय दुसरे काहीच करायचा नाही. पण जेव्हा पुंछमध्ये हल्ला झाला आणि आपले जवान हुतात्मा झाले, तेव्हा पहिल्यांदा सर्जिकल स्ट्राईक करण्यात आले आणि भारताने जगाला दाखवून दिले की त्याच्या सीमांना आव्हान देता येणार नाही.”

Exit mobile version