“भाजपा सर्वच्या सर्व तीस जागा जिंकेल.” असा आत्मविश्वास भाजपाचे नेते आणि ममता बॅनर्जींना थेट आव्हान देणारे सुवेंदू अधिकारी यांनी व्यक्त केला आहे. पश्चिम बंगालमध्ये २७ मार्चला पहिल्या टप्प्याचे मतदान पार पडले. या पहिल्या टप्प्यात पश्चिम बंगालच्या एकूण २९४ जागांच्या विधानसभेपैकी तीस जागांसाठी मतदान झाले. याच तीस जागांविषयी सुवेंदू अधिकारींनी आत्मविश्वास व्यक्त केला आहे.
Entire voting was done in favour of 'poriborton'. BJP will win 30 out of 30 seats in the first phase of the election: Suvendu Adhikari, BJP.#WestBengalPolls pic.twitter.com/hqzUFtArnP
— ANI (@ANI) March 29, 2021
पश्चिम बंगालमध्ये मतदानाला भरभरून प्रतिसाद मिळाल्याचे दिसले आहे. पश्चिम बंगालमध्ये ७९.७९% इतके मतदान पाहायला मिळाले. या वेळच्या पश्चिम बंगालच्या निवडणूका पहिल्यापासूनच भारतभर चर्चेत आहेत. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा गड भेदून तिथे आपली सत्ता प्रस्थपित करण्याचा भारतीय जनता पार्टीने चंग बांधला आहे. भाजपाच्या आक्रमक प्रचारापुढे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या बावचळलेल्या दिसत आहेत.
भाजपा बंगालच्या ट्विटर हॅण्डलवरून ट्विट करत ममता बॅनर्जी यांच्यावर आरोप करत त्यांच्यातील आणि भाजपाच्या एका कार्यकर्त्यातील एक संभाषण प्रसिद्ध करण्यात आले. तर ममता बॅनर्जी यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बांगलादेश दौऱ्यावरच निशाणा साधला. मोदी हे बंगालमधील मतदारांना प्रभावित करण्याचा प्रयत्न करत असल्याचे ममतांनी म्हटले आहे. दरम्यान तृणमूल काँग्रेस पक्षाच्या काही नेत्यांनी ईव्हीएम वर आरोप केले आहेत. दरम्यान अनेक मतदान केंद्रांवर तृणमूल काँग्रेस आणि भाजपाचे कार्यकर्ते यांच्यात संघर्ष झाल्याचेही समजत आहे.
हे ही वाचा:
निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात बंगालमध्ये ८०% तर आसाममध्ये ७३% मतदान
महाराष्ट्रात जमावबंदीची नियमावली जारी
पराभवाच्या भीतीने ममता बॅनर्जी त्रस्त, भाजपा कार्यकर्त्याला फोन करून मदतीची विनवणी
कोविड-१९ विरुद्धच्या आणखी एका लसीच्या चाचणीला सुरूवात
“संपूर्ण मतदान हे परिवर्तनासाठी झालेलं आहे. भाजपा पहिल्या टप्प्यातील तीस पैकी तीस जागा जिंकेल.” असा आत्मविश्वास सुवेंदू अधिकारींनी व्यक्त केला आहे.