“लॉकडाऊन हा कोविड-१९ नियंत्रणात आणण्यासाठीचा उपाय नाही. सरकारने पुन्हा लॉक डाऊन आणला तर भाजपा त्या विरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करेल.” असे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. “मातोश्रीमध्ये बसून लॉकडाउनचा सामान्य लोकांवर होणारा परिणाम दिसू शकत नाही.” असेही ते म्हणाले.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी राज्याच्या प्रशासनाला लॉकडाऊनच्या दृष्टीने तयारी करण्याचे आदेश दिले होते. राज्यातील कोरोना परिस्थिती दिवसेंदिवस अधिकच गंभीर होत चालली आहे. नागरिक हे नियमांचे पालन करताना दिसत नाहीयेत. अशा परिस्थितीत राज्यातील परिस्थिती आणखीनच चिंताजनक होऊ शकते अशावेळी प्रशासनाने लॉकडाऊनच्या दृष्टीने नियोजनासाठी सुरुवात करावी असे आदेश महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रशासनाला दिले होते.
रविवारी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोवीड टास्क फोर्स आणि राज्याचे आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांच्यासोबत बैठक घेतली. या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेत त्याविषयी चिंता व्यक्त केली. राज्यातील जनता नियम पाळत नसून यामुळेच राज्यातील कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे असे मत उद्धव ठाकरे यांनी या बैठकीत उपस्थित केले. हे असेच चालू राहिले तर राज्यात लॉकडाऊनसारखे कठोर निर्बंध आणावे लागतील असे मत उद्धव ठाकरे यांनी मांडले. त्यामुळे त्यासाठीचे नियोजन करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले होते.
हे ही वाचा:
लॉकडाऊन महाराष्ट्राला परवडणार नाही
भाजपा सर्वच्या सर्व तीस जागा जिंकेल
गृहमंत्र्यांनी टार्गेट बाजूला ठेवून इथेही जरा लक्ष द्यावे
“अजित पवार विसरलेत की ते नुसते उपमुख्यमंत्री नाही अर्थमंत्री सुद्धा आहेत. त्यांनी मुख्यमंत्र्यांना स्वतःहून सांगितलं पाहिजे की लॉकडाऊन हे महाराष्ट्राला परवडणार नाही. कोरोना हाताळण्याची सिस्टम दर्जेदार करा पण नोकरी धंद्यांचे नुकसान होता कामा नये. महाराष्ट्राची वाट लावू नका.” असे ट्वीट नीलेश राणे यांनीही केले होते.