ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसी आरक्षण रद्द झालेले आहे. त्यामुळेच भाजपने या ओबीसी आरक्षणासाठी आता पुढाकार घेतलेला आहे. भाजपकडून २६ जूनला संपूर्ण महाराष्ट्रात चक्का जाम आंदोलनाची हाक देण्यात आलेली आहे. ठाकरे सरकारला पंकजा मुंडे यांनी चक्का जाम आंदोलनाचा इशाराच आता दिलेला आहे. ठाकरे सरकारने पुरेसे पुरावे आणि बाजू न मांडल्यामुळे हे आरक्षण हातून गेलेले आहे असा आरोपच आता पंकजा मुंडे यांनी लावलेला आहे. म्हणूनच आता सरकाविरूद्ध २६ जूनला महाराष्ट्रात चक्का जाम आंदोलन करणार असल्याचं पंकजा मुंडे यांनी जाहीर केलं आहे. मराठा आरक्षणाचे ठाकरे सरकारने तीन तेरा वाजवले. ओबीसी आरक्षणातही सरकारचा वेळकाढूपणा सुरूच आहे. त्यामुळे आता भाजपतर्फे या आरक्षणासाठी पुढाकार घेण्यात आलेला आहे.
पुण्यात भाजप कार्यकर्त्यांची बैठक झाल्यानंतर ओबीसी समाजासोबतही एक बैठक झाली. या बैठकींनंतर त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये आंदोलनाची माहीती दिली. अधिक बोलताना त्या म्हणाल्या, ठाकरे सरकारने केवळ वेळकाढूपणा केलेला आहे. त्यामुळेच आता सरकारला जाब विचारण्यासाठी तसेच ओबीसींना आरक्षण मिळावे म्हणून संपूर्ण महाराष्ट्राभर २६ जूनला भाजप चक्का जाम आंदोलन करणार असल्याचे पंकजा मुंडे म्हणाल्या.
हे ही वाचा:
लोकसंख्या नियंत्रण कायदा आणायची योगी सरकारची तयारी
हॅाटेल चालकांना परवाना शुल्कात हवी सूट
आता विधि अभ्यासक्रम पदवीचा गोंधळ
शिवसेनेचे मुख्यमंत्री, तरी होत नाहीत शिवसेना आमदारांची कामे
यासंदर्भात अधिक बोलताना त्या म्हणाल्या, विधानसभा आणि मंत्री हा प्रश्न सोडवू शकतात. ओबीसी आरक्षण मिळत नाही तोपर्यंत राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूका भाजप होऊ देणार नाही. आरक्षण न मिळण्यासाठी केवळ राज्य सरकार जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला. काही झाले तरी केंद्रावर ढकलायचे हे राज्याने थांबवायला हवे. राज्य केंद्राला जबाबदार धरत असेल तर राज्य सरकारचा अभ्यास कमी आहे, असंही त्या पत्रकार परिषदेत म्हणाल्या.