25 C
Mumbai
Wednesday, January 15, 2025
घरराजकारणगोव्यात भाजपाच्या सरकार स्थापनेच्या हालचाली; १४ मार्चला शपथविधी?

गोव्यात भाजपाच्या सरकार स्थापनेच्या हालचाली; १४ मार्चला शपथविधी?

Google News Follow

Related

गोव्यातील विधानसभा निवडणुकीत डबल इंजिनचे सरकार पुन्हा येईल, असे उद्गार काढत भारतीय जनता पार्टीचे गोव्यातील प्रमुख नेते प्रमोद सावंत यांनी आपल्या पक्षाच्या झालेल्या विजयाबद्दल आनंद व्यक्त केला.

गोव्यात भाजपा आता बहुमताच्या दिशेने वाटचाल करत असून दुपारी हाती आलेल्या कलानुसार १९ जागांवर भाजपाने बाजी मारली होती त्यामुळे मगोप आणि अपक्षांना सोबत घेऊन सत्तास्थापनेचा दावा भाजपा करणार आहे. संध्याकाळीच भाजपाचा शपथविधी होईल, असाही अंदाज व्यक्त केला जात आहे. त्याचवेळेला १४ मार्चला हा शपथविधी पार पडेल असेही सूत्रांचे म्हणणे आहे.

महाराष्ट्रातील भाजपाचे नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या प्रभारीपदाखाली गोव्यात भाजपाने निवडणूक लढविली. प्रमोद सावंत हे नव्या विधानसभेसाठीही मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार आहेत. त्यांनी विजय मिळविला असला तरी त्यांना प्रतिस्पर्ध्यांकडून कडवी झुंज मिळाली. काँग्रेसचे धर्मेश सगलानी यांना पराभूत करत प्रमोद सावंत यांनी हा विजय मिळविला. पण हा निसटता विजय होता. एकीकडे माजी मुख्यमंत्री सावंत जिंकले असले तरी उपमुख्यमंत्र्यांना मात्र पराभवाचा धक्का सहन करावा लागला.

हे ही वाचा:

उत्पल पर्रीकर पराभूत

काँग्रेसचे पुन्हा पानिपत! राहुल पाठोपाठ प्रियांकाही नापास

हिजाब वादाचे पुन्हा पडसाद?

आसाम नगरपालिकेमध्ये भाजपाचा मोठा विजय

 

ज्या निकालाकडे लक्ष होते, त्या उत्पल पर्रीकर यांना मात्र पराभव सहन करावा लागला. ८०० मतांनी ते पराभूत झाले. पणजीतून त्यांच्याविरोधात असलेले भाजपाचे बाबुश मॉन्सेरात यांनी विजय मिळविला. विजयाचे श्रेय सगळ्या नेत्यांना देत आहे. स्वयंपूर्ण गोवा करण्यासाठी जनतेने आमच्यावर विश्वास ठेवला आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
222,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा