भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता कायमच राज्य सरकारच्या हिटलरशाही विरोधात लढत राहील असा विश्वास भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी व्यक्त केला आहे. भाजपा पदाधिकारी प्रदीप गावडे यांना ठाकरे सरकारकडून करण्यात आलेल्या अटकेच्या अनुषंगाने चंद्रकांत पाटील आपले मत व्यक्त केले आहे. रविवार २३ मे रोजी प्रदीप गावडे आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांची भेट झाली. या भेटीनंतर चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे सरकारवर हल्ला चढवला आहे.
भारतीय जनता पार्टीचे पदाधीकारी ॲड. प्रदिप गावडे यांना शनिवार, २२ मे रोजी मुंबई पोलीसांनी ताब्यात घेतले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवर केलेल्या टीकेमुळे गावडे यांच्यावर कारवाईचा बडगा उगारण्यात आला होता. पुणे येथील गावडेंच्या राहत्या घरातून त्यांना ताब्यात घेऊन मुंबईला आणण्यात आले. दिवसभर गावडे यांची चौकशी चालली आणि रात्री त्यांना सोडून देण्यात आले. पण गावडे यांच्या प्रकरणावरून भारतीय जनता पार्टी चांगलीच आक्रमक झाली असून त्यांनी सरकारवर हल्ला चढवला. ही अटक बेकायदेशीर असल्याचे कायमच भाजपाकडून सांगण्यात आले.
हे ही वाचा:
‘ठाकरे सरकारचा पॅकेज देण्यावर विश्वास नाही, घेण्यावर आहे’
अनिल परबांनी शेतजमिनीवर बांधले अनधिकृत रिसॉर्ट
अभाविप कार्यकर्त्याच्या घरावर तृणमूलच्या गुंडाचा हल्ला
‘इंडियन व्हेरीअंट’ म्हणणाऱ्या कमलनाथांवर गुन्हा
या पार्श्वभूमीवर रविवार, २३ मे रोजी भाजपाचे महाराष्ट्र्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी प्रदीप गावडे यांची भेट घेतली. या भेटीचा तपशील आपल्या ट्विटर खात्यावरून शेअर करताना चंद्रकांत पाटलांनी ठाकरे सरकारवर टीकास्त्र डागले आहे. भाजपाचा प्रत्येक कार्यकर्ता राज्य सरकारच्या हिटलरशाही विरोधात लढत राहील असे पाटील यांनी म्हटले आहे. तर त्याचवेळी पक्ष गावडे यांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचेही पाटील यांनी सांगितले.
भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता राज्यसरकारच्या हिटलरशाहीविरुद्ध लढत राहील. शरजील उस्मानी विरोधात तक्रार करणारे आमचे युवा मोर्चाचे नेते ऍड.प्रदीप गावडे यांना बेकायदेशीररित्या अटक करून सरकार भीती घालण्याचा प्रयत्न करत आहे. पण आम्ही सर्वजण त्याच्या सोबत होतो, आहोत आणि राहू. pic.twitter.com/9CadzK2BiC
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) May 23, 2021