नगर पंचायत निवडणुकांमध्ये भाजपाचा एकतर्फी विजयी

नगर पंचायत निवडणुकांमध्ये भाजपाचा एकतर्फी विजयी

राज्यात नगर पंचायत निवडणुकांचे पडघम वाजले आहेत. महाराष्ट्रातील सर्व प्रमुख पक्षांनी या निवडणुकीच्या दृष्टीने कंबर कसली आहे. अशावेळीच भारतीय जनता पक्षाचे नेते आणि केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे या निवडणुकांच्या दृष्टिने एक महत्वाचे विधान केले आहे. आगामी नगर पंचायत निवडणुकांमध्ये भाजपाचा एकतर्फी विजयी होईल असा विश्वास नारायण राणे यांनी व्यक्त केला आहे. सिंधुदुर्ग येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

शुक्रवार, १७ डिसेंबर रोजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सिंधुदुर्ग येथे पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी राणेंनी अनेक महत्वाच्या विषयांवर भाष्य केले आहे. ठाकरे सरकारवर प्रहार करताना कोरोना काळात राज्यात झालेल्या मृत्यूंना महाराष्ट्रातील ठाकरे सरकार जबाबदार आहे असे राणे म्हणाले तर जैतापूर येथील जनतेला प्रकल्प हवा आहे आणि त्या संदर्भात स्थानिक नागरिक मला भेटले असल्याचे राणे यांनी म्हटले आहे. तर राज्यात होऊ घातलेल्या नगर पंचायत निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टीचा एकतर्फी विजय होईल असे मत राणे यांनी मांडले आहे.

हे ही वाचा:

विद्यापीठाच्या स्वायत्ततेवर ठाकरे सरकारचा घाला

चक्क सापाला हातात धरून मारल्या दोरीउड्या

केरळमधील शाळेत मुलं- मुली वापरणार सारखाच गणवेश

टाटांचा महिलांसाठी ‘हा’ अभिमानास्पद निर्णय

२१ डिसेंबर रोजी राज्यातील १०६ नगरपरिषदा आणि दोन जिल्हा परिषदांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. तर या निवडणुकांमधील ओबीसींसाठी आरक्षित असलेल्या जागा खुल्या करून तिथे निवडणूक घेतली जाणार आहे. त्यामुळे या निवडणुका पुढे ढकलण्यात आली असून आता जानेवारी २०२२ मध्ये १८ तारखेला या निवडणुकांसाठी मतदान होणार आहे. तर या सर्व निववडणुकीचा निकाल आणि मतमोजणी १९ जानेवारी रोजी होणार आहे.

Exit mobile version