24 C
Mumbai
Monday, January 6, 2025
घरराजकारणदक्षिणेतही भाजपला मिळणार ताकद; ममता यांना बसणार धक्का

दक्षिणेतही भाजपला मिळणार ताकद; ममता यांना बसणार धक्का

प्रशांत किशोर यांचे भाकीत

Google News Follow

Related

राजकीय रणनितीकार प्रशांत किशोर यांनी भाजपला दक्षिण आणि पूर्वेकडील राज्यांमध्ये चांगल्या जागा मिळतील, असे भाकीत वर्तवले आहे. प्रशांत किशोर यांनी पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत ही माहिती दिली. लोकसभा निवडणुकीत भाजप ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्ये क्रमांक एकचा पक्ष राहील. तेलंगणात भाजप पहिल्या किंवा दुसऱ्या क्रमांकावर असेल. तर, तमिळनाडूमध्ये भाजपचा मतटक्का दुहेरी आकडे गाठेल, असे भाकीत त्यांनी वर्तवले आहे.

एकूण ५४३ जागांपैकी तेलंगणा, ओडिशा, पश्चिम बंगाल, तमिळनाडू, आंध्र प्रदेश, बिहार आणि केरळमध्ये २०४ जागा आहेत. भाजप सन २०१४ आणि २०१९मध्ये या सर्व राज्यांमधून मिळून ५० जागाही मिळवू शकली नव्हती.
विरोधी पक्षांच्या आळशी व कमकुवत रणनितीमुळे भाजपला दक्षिण आणि पूर्व भारतात फायदा होताना दिसत आहे. या दोन्ही भागांत सन २०१९च्या तुलनेने पक्षाचा मतटक्का आणि जागांमध्ये वाढ होऊ शकते. या दोन्ही भागांत पक्षाची पकड कमी आहे, असे प्रशांत किशोर यांनी म्हटले आहे.

तर राहुल गांधी यांनी पाऊल मागे टाकावे

जर काँग्रेसला २०२४च्या लोकसभा निवडणुकीत अपेक्षेपेक्षा कमी जागा मिळाल्यास राहुल गांधी यांनी स्वतःचे पाऊल मागे घेण्याबाबत विचार केला पाहिजे. राहुल गांधी हे काँग्रेसला जिंकून देण्यासाठी गेल्या १० वर्षांपासून अयशस्वी प्रयत्न करत आहेत. असे असूनही ना ते राजकारणापासून अलग झाले आणि ना कोणाला पक्षाचा चेहरा बनू दिला. हे लोकशाहीनुसार नाही, अशी टीका त्यांनी केली.

हे ही वाचा..

लोकसभेपूर्वी कर्नाटक पोलिसांची धडक कारवाई; ७.६ कोटींची रोकड, सोने-चांदी जप्त

खलिस्तानी समर्थक अमृतपाल सिंगच्या आईला अटक

मोदीच्या गॅरंटीमुळे इंडी आघाडी चिंतेत!

पंजाबमध्ये ५५ वर्षीय महिलेची नग्न धिंड; तिघांना अटक, दोघांचा शोध सुरू

‘जेव्हा तुम्ही गेल्या १० वर्षांपासून एकच काम करत आहात आणि तुम्हाला यश मिळत नसेल तर ब्रेक घेण्यात काहीच चुकीचे नाही. तुम्ही हे काम आणखी कोणाला तरी पाच वर्षांसाठी दिले पाहिजे. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येनंतर सोनिया गांधी यांनी काय केले. १९९१मध्ये त्या राजकारणापासून दूर होत्या. काँग्रेसची धुरा पी. व्ही. नरसिंहराव यांच्यावर सोपवली. त्याचा परिणाम तुम्हाला माहीत आहे,’ याची आठवण प्रशांत किशोर यांनी करून दिली.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
220,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा