महाराष्ट्रात लवकरच भाजपाचे सरकार

महाराष्ट्रात लवकरच भाजपाचे सरकार

‘महाराष्ट्र में जल्द ही कमल का परचम लेहराएगा’ असे म्हणत राज्यात लवकरच भाजपाचे सरकार येईल असा हुंकार भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांनी केला आहे. गुरुवार, ११ नोव्हेंबर रोजी जे.पी. नड्डा यांचे मुंबईत आगमन झाले. यावेळी विमानतळावर त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. यानंतर नड्डा यांनी उपस्थित कार्यकर्त्यांशी संवाद साधला.

अनेकदा ढग दाटून येतात. या ढांगांमध्ये राष्ट्रवादी शक्तींचा सूर्य झाकला जातो. पण हे ढग सूर्याला रोखू शकत नाहीत असे नड्डा यांनी म्हटले. तर महाराष्ट्रात लवकरच भाजपाचा झेंडा पुन्हा फडकेल असे म्हणत त्यांनी राज्यात भाजपा पुन्हा सत्तेत येणार असल्याचे सूतोवाच केले आहे. राज्याचे राजकारण तापलेले असताना नड्डा यांचा हा मुंबई दौरा आणि मुंबईत येऊन त्यांनी दिलेला हा इशारा फारच महत्वाचा मानला जात आहे. काही दिवसांपूर्वीच भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय कार्यकारणीत जे.पी.नड्डा यांनी महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार उखडून फेकण्याची भाषा केली होती. तर त्यानंतर अवघ्या काही दिवसांतच नड्डा यांनी पुन्हा एकदा भाजपचे सरकार महाराष्ट्रात येणार असल्याचे सांगितले आहे.

हे ही वाचा:

 गुजरातमध्ये हस्तगत केलेल्या ३०० कोटींच्या ड्रग्सचे मुंब्रा कनेक्शन

कंगनाचे सर्व पुरस्कार परत घ्या, संजय राऊतांची मागणी

‘अंगार विसरलेले मुख्यमंत्री सध्या भंगाराचे कौतुक करतात’

आज पासून सुरु होणार आरबीआयच्या दोन नव्या योजना, ग्राहकांना मिळणार ‘हा’ फायदा

उत्तन येथील सुप्रसिद्ध प्रशिक्षण संस्था रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी येथे आसाम मधील भाजपा आमदारांचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. या प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन नड्डा यांच्या हस्ते होणार आहे. त्यानिमित्तानेचे नड्डा हे मुंबईत दाखल झाले आहेत. या व्यतिरिक्त त्यांचा इतर कोणता राजकीय कार्यक्रम अद्याप तरी समोर आलेला नाही. नड्डा यांचे गुरुवारी मुंबईत आगमन झाल्यावर भाजपा कार्यकर्त्यांनी त्यांचे जंगी स्वागत केले.

Exit mobile version