बंगालमधील राजकीय हिंसा संपवण्यासाठी भाजपाची शपथ

बंगालमधील राजकीय हिंसा संपवण्यासाठी भाजपाची शपथ

बुधवार, ५ मे रोजी एकीकडे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राज्याच्या मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. तर दुसरीकडे त्याच वेळी भारतीय जनता पार्टीकडून पश्चिम बंगालमधील राजकीय हिंसा संपवण्यासाठी शपथ घेण्यात आली. भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जगात प्रकाश नड्डा यांच्या उपस्थितीत बंगाल भाजपाकडून ही शपथ घेण्यात आली.

२ मे रोजी पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांचे निकाल लागल्यापासून राज्यात हिंसाचार सुरु झाला आहे. तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून हा हिंसाचार सुरु असून भाजप कार्यकर्त्यांना लक्ष्य केले जात आहे. गेल्या तीन दिवसांत लूट, मारहाण, तोडफोड, जाळपोळ, महिला अत्याचार, बलात्कार यांच्या अनेक घटना राज्यातुन समोर आल्या आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा हे सध्या दोन दिवसांच्या पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर आहेत. या आपल्या दौऱ्यात ते हिंसाचाराचा बळी ठरलेल्या भाजपा कार्यकर्त्यांच्या घरी भेट देत आहेत.

हे ही वाचा:

ठाकरे सरकारने मराठा आरक्षण विषयाचे फक्त राजकारण केले

मराठा आरक्षण रद्द झाल्याने महाराष्ट्रातील राजकारण तापले

बंगालची आजची परिस्थिती फाळणीच्या वेळी होती तशी

…तर देशभरातील भाजपा कार्यकर्ते प. बंगालमध्ये धडकतील

या हिंसाचाराचा निषेध करण्यासाठी बुधवारी भाजपातर्फे राष्ट्रव्यापी निदर्शने आयोजित करण्यात आली आहेत. नड्डा स्वतः बंगालमध्ये कोलकाता येथे होणाऱ्या निदर्शनात सहभागी झाले होते. या आंदोलनासाठी जे व्यासपीठ बांधण्यात आले होते ते बंगाल पोलिसांनी तोडल्याचा आरोप भाजपाने केला आहे. त्यामुळे कोलकाता येथील पक्ष कार्यालयातच ही निदर्शने करण्यात आली. याचवेळी भाजपाकडून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानिक मूल्यांचे रक्षण करत बंगालमधील हिंसाचार संपवण्याची शपथ घेतली आहे.

Exit mobile version