राहुलजी, १०० कोटी लशी आल्या, लोकांनी घेतल्यासुद्धा!

राहुलजी, १०० कोटी लशी आल्या, लोकांनी घेतल्यासुद्धा!

भाजपाने लगावला राहुल गांधींना टोला

“जुलै आला आहे, लस आली नाही”, असे ट्विट करून केंद्र सरकारवर निशाणा साधणाऱ्या काँग्रेसच्या राहुल गांधी यांना जशात जसे ट्विट करत भाजपाने उत्तर दिले आहे. १०० कोटी लसी आल्या आणि लोकांनी घेतल्यासुद्धा असे ट्विट भाजपाने केले आहे.

दरम्यान, सध्याच्या घडीला देशामध्ये कोरोना लसीकरण अभियान वेगाने सुरु आहे. भारतासारख्या मोठी लोकसंख्या असलेल्या देशात कोरोना लसीकरण राबविणे हे नक्कीच कौतुकास्पद बाब आहे. केंद्र सरकारने केलेले उत्तम नियोजन तसेच लसींचा पुरवठा हेच १०० कोटी लसीकरणासाठी एकमेव कारण आहे.

 

हे ही वाचा:

भारतही हायपरसॉनिक क्षेपणास्त्र विकसित करत आहे

बिल गेट्स का पडले मोदी आणि भारतीय लसीकरण मोहिमेच्या प्रेमात?

अविघ्न पार्क आगीवरून पेटला वाद! नेमके दोषी कोण?

निहंगांची पुन्हा दहशत; फुकट कोंबडी दिली नाही म्हणून केली मारहाण

 

जुलैमध्ये राहुल गांधींनी कोरोना लसीच्या कथित अभावावरून केंद्र सरकारवर निशाणा साधला होता. या दरम्यान, राहुल गांधी यांनी ट्वीट करून म्हटले होते की ‘जुलै आला आहे, लस आली नाही’ असे म्हटले जाते की ‘१०० कोटी लस आल्या, आणि करोडो देशवासियांनाही ते मिळाले.’ यासोबतच राहुल गांधी यांच्या या वक्तव्यावर टीका करताना त्यांनी राजकारण करू नये असा आग्रहही केला. गुरुवारी भारताने कोरोना लसीकरण मोहीम यशस्वीरीत्या राबवून १०० कोटींचा जादुई आकडा पार केला. विशेष म्हणजे जागतिक आरोग्य संघटनेने भारताच्या या कामगिरीबद्दल अभिनंदन केले आहे. जागतिक आरोग्य संघटनेने आपल्या अभिनंदन संदेशात नागरिक, शास्त्रज्ञ आणि पंतप्रधान मोदी यांचा उल्लेख केला आहे.

Exit mobile version