राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि महाराष्ट्राचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांची ईडी मार्फत चौकशी सुरु झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गोटात खळबळ माजली आहे. ही कारवाई सूडबुद्धीने होत असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून केला जात आहे. तर राष्ट्रवादीचे नेते माजीद मेमन यांनी या प्रकरणात पत्रकार परिषद घेत भाजपावर आरोप केले आहेत. महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी हरप्रकारे प्रयत्न होत असल्याचे मेमन यांनी म्हटले आहे.
सकाळी टीव्ही लावला तेव्हा आम्हाला कळलं की नवाब मलिक साहेबांना ताब्यात घेऊन चौकशी करण्यात येत आहे. तेव्हापासून ४ तास झाले या प्रकरणाचे राजकारण सुरु आहे. पण केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज हे सांगितले की ईडीचे अधिकारी पीएमएलए कायद्याचा गैरवापर करत कारवाई करत नाहीत. आजच केंद्रीय अर्थमंत्र्यांना हे का सांगावेसे वाटले? असा सवाल मेमन यांनी केला आहे.
हे ही वाचा:
मुस्लिम कार्यकर्ता असला की त्याचे नाव दाऊद सोबत जोडले जाते
‘नवाब मलिक हे आता मंत्रिमंडळात राहू शकत नाहीत’
‘दाऊद सबंधितांशी नवाब मलिकांचे व्यावसायिक संबंध’
नवाब मलिक यांची ईडी चौकशी सुरु! आज अटक होणार?
२०१९ ला महाराष्ट्रात जेव्हा महाविकास आघाडीचे सरकार आले तेव्हा तो सर्वांसाठी धक्का होता. कारण मोदी, शहा हे रोखू शकले नाहीत. फडणवीसांनी त्यांना हवे ते डावपेच खेळले पण तरी त्यांना यश आले नाही. पण तेव्हापासून आजपर्यंत हे सरकार पाडण्यासाठी हरप्रकारे प्रयत्न केले जात आहेत असे मेमन यांनी म्हटले.
अर्थमंत्री सांगतात की पीएमएलए कायद्याच्या अंतर्गतच कारवाई होत आहे. पण हा विषय गृह मंत्र्यांच्या अखत्यारीत येतो. गेल्या काही काळापासून या केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर होत्र असल्याचा आरोप सातत्याने होत आहे. पश्चिम बंगालमध्येही ममता बॅनर्जींच्या सरकार विरोधात या यंत्रणांचा वापर करण्यात आला. जिथे शक्य असेल तिथे ईडी, सीबीआय, आयकर विभाग या सारख्या यंत्रणांचा वापर केला जातो. आज आपण तेच नवाब मलिक यांच्या बाबत पाहिले असे मेमन यांनी सांगितले.