ममतांच्या हिंसाचाराविरूद्ध भाजपाचे देशव्यापी धरणे आंदोलन

ममतांच्या हिंसाचाराविरूद्ध भाजपाचे देशव्यापी धरणे आंदोलन

पश्चिम बंगालच्या निवडणुकीत विजय झाल्यानंतर लगेचच तृणमुलने आपले मूळ रंग दाखवायला सुरूवात केली आहे. बंगालमध्ये जागोजागी हिंसाचाराचे सत्र सुरू झाले आहे. यामध्ये काही भाजपा कार्यकर्त्यांना आपला जीव देखील गमवावा लागला आहे. भाजपाने या सर्वाविरूद्ध देशव्यापी धरणे आंदोलनाची हाक दिली आहे.

पश्चिम बंगालच्या विधानसभेतील विजयानंतर ठिकठिकाणी भाजपाच्या कार्यकर्त्यांवर आणि कार्यालयांवर हल्ले करण्यात आले आहेत. आत्तापर्यंत एकूण ११ कार्यकर्त्यांची निर्घृण हत्या करण्यात आल्याचे देखील म्हटले जात आहे. याबद्दलचे विविध व्हिडिओदेखील प्रसिद्ध झाले आहेत. भाजपाने याप्रकरणी तृणमुल काँग्रेसवर टीकेची झोड उठवली आहे. बंगालच्या राज्यपालांनी देखील याबाबतचा सविस्तर अहवाल राज्याच्या गृहसचिवांकडे मागितला आहे. त्याबरोबरच पोलिसांना देखील याबाबत योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. तृणमुल काँग्रेसने मात्र शहाजोगपणे हे सर्व आरोप फेटाळले आहेत.

हे ही वाचा:

शरद पवारांच्या ‘अदृश्य हातांना’ पंढरपूरची एक सीट जिंकता आली नाही

हिंसाचार थांबवण्यासाठी केंद्रीय सुरक्षा दलांना बंगालमध्ये तैनात करा

पंतप्रधानांच्या या योजनेमुळे २ लाखांपर्यंतचे सुरक्षा कवच

महाराष्ट्रातील कोविड रुग्णवाढ ५० हजारांखाली

भाजपाने ५ मे रोजी देशव्यापी आंदोलनाची हाक दिली आहे. कोविडच्या सर्व निर्बंधांचे पालन करत हे आंदोलन केले जाईल असे देखील भाजपाकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा आजपासून दोन दिवसांच्या बंगाल दौऱ्यावर आहेत. यावेळी ते या हिंसाचारात बळी पडलेल्या कार्यकर्त्यांच्या कुटुंबियांना भेटणार आहेत.
Exit mobile version