ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजपाचे राज्यव्यापी आंदोलन

ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजपाचे राज्यव्यापी आंदोलन

‘महाराष्ट्रातील सत्ताधारी ठाकरे सरकारने ओबीसी समाजाचा विश्वासघात करून ओबीसी आरक्षण घालविले आहे’ असे म्हणत भारतीय जनता पार्टीने ठाकरे सरकार विरोधात आंदोलन पुकारले आहे. बुधवार, १५ सप्टेंबर रोजी राज्यभर हे आंदोलन करण्यात येणार आहे. भारतीय जनता पार्टीतर्फे मंगळवार, १४ सप्टेंबर रोजी या संबंधीची घोषणा करण्यात आली आहे. भाजपाचे महाराष्ट्र सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.

राज्यातील आघाडी सरकार सर्वोच्च न्यायालयात ओबीसी आरक्षणाची बाजू मांडण्यात अपयशी ठरले असा कबुली जबाब काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. नाना पटोले यांच्या या आरोपावर मुख्यमंत्री ठाकरे व ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी उत्तर द्यावे, अशी मागणीही बावनकुळे यांनी केली.

हे ही वाचा:

मुख्यमंत्री महोदय…आधी मंत्रिमंडळातील बलात्काऱ्यांवर कारवाई करा

अभिमानास्पद! भारतात लसीकरणाचा ‘अमृत महोत्सव’

रक्षकच बनला भक्षक! पोलिसाकडून अल्पवयीन मुलीचे अपहरण

ज्योती देवरेंच्या बदलीवरून चित्रा वाघ आक्रमक

गेले सहा महिने आघाडी सरकार ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाबाबत टोलवाटोलवी करत आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार सरकारने एकही गोष्ट करायचा प्रयत्न केला नाही. काहीच काम सुरु केले नाही. ओबीसी समाजाचा इम्पिरीकल डेटा गोळा करण्यासाठी तातडीने कार्यवाही सुरू करा, असे भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाने राज्य सरकारला वारंवार सांगितले. मात्र आघाडी सरकारने गेल्या सहा महिन्यांत काही हालचालीच केलेल्या नाहीत. इम्पिरीकल डेटा गोळा करण्यासाठी नेमलेल्या मागासवर्गीय आयोगाला आघाडी सरकारने निधीही दिला नाही. या हलगर्जीचा परिणाम ओबीसी आरक्षणाशिवाय ५ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होण्यात झाला आहे.

ठाकरे सरकार मधील एका वजनदार गटाला पुढील वर्षी होणाऱ्या महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद निवडणुका ओबीसी समाजाला आरक्षण न देताच घ्यायच्या असल्याचा गंभीर आरोप बावनकुळे यांनी केला आहे. ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका होणार नाहीत असे वारंवार सांगणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी आरक्षण टिकविण्यासाठी काहीच हालचाल केली नाही.त्यामुळेच ओबीसी समाजाच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्या आघाडी सरकारच्या विरोधात भारतीय जनता पार्टीतर्फे उद्या १५ सप्टेंबर रोजी तालुका पातळीपर्यंत आंदोलन केले जाईल, असेही बावनकुळे यांनी नमूद केले.

Exit mobile version