आंध्र प्रदेशात भाजपा लवकरच मोठी शक्ती बनेल

आंध्र प्रदेशात भाजपा लवकरच मोठी शक्ती बनेल

आंध्र प्रदेशात ‘राजकीय पोकळी’ निर्माण झाली आहे. असे निरीक्षण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सोमवारी राज्य भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना लोकांच्या गरजा आणि तक्रारी जाणून घेऊन ही पोकळी भरून काढण्यासाठी प्रभावीपणे प्रयत्न करण्याचे आवाहन केले.

तिरुपतीमधील तीन दिवसांचा दौरा संपण्यापूर्वी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी संवाद साधताना, शाह यांनी पुन्हा तेलुगू देसम पार्टी (टीडीपी) सोबत युती करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही याचा पुनरुच्चार केला.

त्याचवेळी त्यांनी राज्यातील सत्ताधारी वायएसआर काँग्रेससोबत कोणताही समझोता असल्याचाही इन्कार केला. “टीडीपी हे एक भूतकाळातले प्रकरण आहे. ते नेतृत्वाच्या संकटाचा सामना करत आहे. यामुळे राजकीय पोकळी निर्माण झाली आहे आणि आम्हाला ती जागा काबीज करावी लागेल.” असे अमित शहांनी बंद दरवाजाच्या बैठकीत त्यांच्या राज्य युनिटच्या नेत्यांना सांगितले.

बैठकीला उपस्थित असलेल्या एका वरिष्ठ राज्य नेत्याने पीटीआयला सांगितले की, श्री शाह यांनी लोकांचे प्रश्न उचलून त्यांच्यासाठी लढण्याच्या गरजेवर भर दिला.

“मूळत: त्यांनी आम्हाला एपीमधील प्रचलित राजकीय परिस्थितीमध्ये अवलंबल्या जाणार्‍या कृतीबद्दल मार्गदर्शन केले. आम्ही संधीचा चांगला उपयोग करून एक शक्तिशाली पक्ष म्हणून उदयास यावे अशी त्यांची इच्छा होती.” असे नेते पुढे म्हणाले.

श्री शाह यांनी राज्याच्या नेत्यांना जोरदारपणे सांगितले की भाजपा, टीडीपी आणि वायएसआर या दोन्ही पक्षांशी समान अंतर राखेल. भाजपची सध्या तेलुगू अभिनेता पवन कल्याणच्या जनसेनेशी युती आहे.

हे ही वाचा:

काय आहे पूर्वांचल एक्सप्रेसवेचे महत्व?

राज्याला फडणवीसांसारख्या फुलटाईम मुख्यमंत्र्याची गरज

रझा अकादमी, अर्जुन खोतकर नितेश राणेंच्या निशाण्यावर

पूजा ददलानीला तिसरे समन्स; त्यानंतर काय?

भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस (संघटन) बीएल संतोष आणि नवी दिल्लीतील इतर नेते, राज्य युनिटचे अध्यक्ष सोमू वीरराजू, माजी अध्यक्ष कन्ना लक्ष्मीनारायण आणि माजी केंद्रीय मंत्री दग्गुबती पुरंदेश्वरी आदी या बैठकीला उपस्थित होते.

गृहमंत्र्यांनी नंतर राज्यसभा सदस्य वायएस चौधरी आणि सीएम रमेश यांच्याशी स्वतंत्र बैठक घेतली. ज्यांनी टीडीपीमधून भाजपमध्ये प्रवेश केला होता.

Exit mobile version