गुजरातमध्ये ग्रामीण भागातही भाजपाचाच दबदबा?

गुजरातमध्ये ग्रामीण भागातही भाजपाचाच दबदबा?

आज गुजरातमध्ये ८१ नगरपालिका, ३१ जिल्हा परिषदा आणि २३१ तालुका पंचायतींच्या निवडणुका होत आहेत. गुजरातमध्ये नुकत्याच झालेल्या महानगरपालिका निवडणुकांमध्ये भाजपाला घवघवीत यश मिळाले आहे. या निकालांमधून आपल्याला भाजपावर शहरी भागातील लोकांचा विश्वास आणि विरोधी पक्षांवर असलेला अविश्वास दिसून येतो. आता ग्रामीण भागामध्येही भाजपाला जनतेचा तेवढाच पाठिंबा मिळतो का? याकडे सर्वांचे लक्ष आहे.

गुजरातमधील सहा महापालिकांच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष आघाडीवर आहे. गुजरातमधील वडोदरा, अहमदाबाद, जामनगर, राजकोट, सूरत आणि भावनगर या सहा महापालिकांमधील निवडणुकांचे निकाल लागले आहेत. गुजरातमधील या सहा महापालिकांमधील ५७४ वॉर्ड्समध्ये निवडणूक झाल्या. यापैकी ४८४ वॉर्ड्समध्ये भाजपाला विजय मिळाला आहे.

हे ही वाचा:

गुजरात महापालिका निवडणुकांमध्ये भाजपाला घवघवीत यश

गुजरातमधील सर्वात मोठी महानगरपालिका असलेल्या अहमदाबाद महानगरपालिकेमधील १९२ पैकी १६० जागांवर भाजपाला यश मिळाले आहे. सुरतमधील १२० जागांपैकी ९३ जागांवर भाजपाला विजय मिळाला आहे. वडोदरा महानगरपालिकेतील ७६ जागांपैकी ६९ जागांवर भाजपाला यश मिळाले आहे.

डिसेंबर २०२२ मध्ये गुजरातमध्ये विधानसभा निवडणूक आहेत. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शहरी भागातील आणि ग्रामीण भागातील या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका अत्यंत महत्वाच्या आहेत.

Exit mobile version