भारतीय जनता पक्षाने आपला स्थापना दिवस मोठ्या थाटामाटात साजरा करण्यासाठी जोरदार तयारी तयारी सुरू केली आहे. भाजप पक्षाला यावर्षी ४३ वर्ष पूर्ण होत असून येत्या ६ एप्रिल रोजी स्थापना दिवस साजरा करण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्थापना दिवसानिमित्त देशभरातील पक्ष पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतील.
भाजप हा जगातील सर्वात मोठा राजकीय पक्ष आहे. देशात भाजपचे सर्वाधिक खासदार, आमदार आणि नगरसेवक आहेत. बहुतांश राज्यात पक्षाचे सरकार आहे. देशभरातील कार्यकर्त्यांना स्थापना दिन उत्साहात साजरा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यासोबतच पक्षाचा झेंडा फडकावा आणि मिठाई व फळे वाटण्यात यावीत, असे सांगण्यात आले आहे.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी सर्व प्रदेशाध्यक्ष आणि पक्षाच्या नेत्यांना सामाजिक सद्भाव सप्ताहात सक्रिय सहभागी होण्यासाठी पत्र लिहिले आहे. पत्र जारी करण्यासोबतच नड्डा यांनी या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा सर्व प्रदेशाध्यक्षांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी ६ एप्रिल रोजी सकाळी मार्गदर्शन करणार आहेत. त्यादृष्टीने पंतप्रधान मोदींच्या मार्गदर्शनासाठी भाजपने पक्ष कार्यकर्त्यांना पात्र पाठवून राज्य, जिल्हा, विभागीय, बूथ स्तरावरील कार्यालयांमध्ये एकत्र येऊन पंतप्रधानांचा संदेश ऐकला जाईल याची खात्री करण्यास सांगितले आहे.
पंतप्रधानांच्या भाषणानंतर १४ एप्रिलपर्यंत भाजप कार्यकर्त्यांनी पक्षाचा इतिहास आणि केंद्र सरकारच्या कामगिरीवर चर्चासत्र आणि चर्चा आयोजित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पक्षाचे पदाधिकारी आणि सर्व खासदार आणि आमदारांनी स्थापना दिनाच्या कार्यक्रमात भाग घ्यावा असे सांगण्यात आले आहे एका विधानसभा मतदारसंघात किमान तीन कार्यक्रम आयोजित करणे आणि इंटरनेट मीडियावर फोटो शेअर करण्यास सांगण्यात आले आहे.
हे ही वाचा:
देशभरात रामनवमीच्या शोभायात्रांना केले ‘लक्ष्य’
अजित पवार न्यायालयापेक्षा मोठे झाले का?
घर खरेदी करा जुन्या रेडीरेकनर दरानेच
मनीष सिसोदिया यांचा जामीन अर्ज फेटाळला
आठवडाभर सामाजिक समरसता अभियानाचे नियोजन
बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती ६ एप्रिल ते १४ एप्रिलपर्यंत आठवडाभर सामाजिक समरसता अभियानाचे नियोजन पक्षाने केले आहे. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती बूथ स्तरावरील कार्यक्रमात त्यांचे छायाचित्र लावून साजरी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सामाजिक न्याय सप्ताहाच्या काळात गरीब, शोषित, वंचित, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि मागासवर्गीयांच्या कल्याणासाठी उचललेल्या पावलांवर चर्चा केली जाईल.थोर समाजसुधारक आणि विचारवंत ज्योतीबा फुले यांच्या जयंतीनिमित्त ११ एप्रिल रोजी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
मागासवर्गीयांसाठी घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयांवर चर्चा
मोदी सरकार आणि राज्यातील भाजप सरकारांनी मागासवर्गीयांसाठी घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयांवर चर्चा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. प्रत्येक जिल्ह्यात पक्षाच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा सन्मान करण्यात यावा, गुणवंत विद्यार्थ्यांचाही सन्मान करण्यात यावा, मोफत आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात यावे, या सर्व कार्यक्रमांना सर्व खासदार, आमदार व इतर लोकप्रतिनिधींनी उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.