भारतीय जनता पार्टी ठाणे जिल्ह्याच्या वतीने प्लाझ्मा हेल्पलाईनची सुरवात करण्यात आली आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या प्लाझ्मा हेल्पलाईनचे अनावरण करण्यात आले. या हेल्पलाईनच्या माध्यमातून ठाण्यातील कोविड रुग्णांना प्लाझ्मा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
कोविडच्या या दुसऱ्या लाटेचा सर्वाधिक फटका हा महाराष्ट्राला बसत आहे. कोविडचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आहेत. अशा परिस्थितीत आरोग्य व्यवस्थेवर ताण पडत आहे. बेड्स, ऑक्सिजन, रेमडेसिवीर यांचा तुटवडा जाणवत आहे. कोविड उपचारात आवश्यक असणाऱ्या प्लाझ्मासाठीही प्रचंड शोधाशोध रुग्णाचे नातेवाईक करत असतात. त्यांना एक मदतीचा हात देण्यासाठी ठाणे भाजपातर्फ़े पुढाकार घेण्यात आला आहे.
हे ही वाचा:
आक्षेपार्ह ट्वीटमुळे ट्वीटरकडून कंगनाचे अकाऊंट बंद
ठाणे भाजपातर्फ़े एका प्लाझ्मा हेल्पलाईनचा शुभारंभ करण्यात आला आहे. भारतीय जनता युवा मोर्चाचे महाराष्ट्र उपाध्यक्ष ऍड. मयुरेश जोशी यांच्या संकल्पनेतून ही हेल्पलाईन सुरु करण्यात आली आहे. www.bjpthane4plasma.co.in ही वेबसाईट भाजपा ठाणेतर्फे तयार केली गेली आहे. ही हेल्पलाईन दुहेरी पद्धतीने कार्यरत असेल. म्हणजेच ज्यांना प्लाझ्मा हवा आहे ते प्लाझ्मासाठी संपर्क करू शकतात आणि ज्यांना प्लाझ्मा दान करायचा ते देखील प्लाझ्मा दान करू शकतात. पुढील महिन्याभरात ६०० पेक्षा अधिक लोकांपर्यंत या हेल्पलाईनच्या माध्यमातून प्लाझ्मा पोहोचवला जाणार आहे अशी माहिती मयुरेश जोशी यांनी डंकाशी बोलताना दिली.
३ मे रोजी महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या हेल्पलाईनचे अनावरण केले. या वेळी ठाणे महापालिकेतील भाजपाचे गटनेते मनोहर डुंबरे, ठाणे भाजपा संघटन सरचिटणीस विलास साठे, भाजयुमो ठाणे जिल्हा सरचिटणीस समर्थ नायक हे उपस्थित होते.