भारताचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी तर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन होताना दिसत आहे. या निमित्ताने भाजपा ठाण्याचा सोशल मीडिया सेलतर्फे एक प्रश्नमंजुषा स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे. १२ ते २१ या वयोगटातील शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी ही स्पर्धा असणार आहे. तर या स्पर्धेत विजेते ठरणाऱ्या स्पर्धकांना आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहेत
या स्पर्धेत जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभाग घ्यावा असे आवाहन ठाणे भाजपाच्या सोशल मीडिया टीमतर्फे करण्यात आले आहे. या स्पर्धेचे नियम आणि अटी खालीलप्रमाणे असणारे आहेत
स्पर्धेचे नियम आणि अटी
१. स्पर्धा फक्त शाळा आणि कॉलेज विद्यार्थ्यांसाठीच आहे.
२. वयोगट : १२ वर्षे ते २१ वर्षे
३. विषयार्थ्यांचे ओळखपत्र आवश्यक
४. गुगल फॉर्म मधील प्रश्नांची उत्तरं पाठवायची अंतिम तारीख : २४ सप्टेंबर २०२१ संध्याकाळी ७ वाजेपर्यंत
५. बक्षीस समारंभ २५ सप्टेंबर रोजी करण्यात येईल.
६. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक स्पर्धकाला प्रशस्तिपत्रक देण्यात येईल.
७. पहिल्या ४ क्रमांकाना प्रत्येकी रोख रुपये २००० चे गिफ्ट व्हाउचर देण्यात येईल.
८. पुढील ४ क्रमांकाना प्रत्येकी रोख रुपये १००० चे गिफ्ट व्हाउचर देण्यात येईल.