काँग्रेस आमदाराने दिली राम मंदिराला देणगी

काँग्रेस आमदाराने दिली राम मंदिराला देणगी

उत्तर प्रदेशच्या रायबरेलीमधून निवडून येणाऱ्या अदिती सिंग यांनी राम मंदिर उभारणीसाठी ५१ लाख रुपयांचा निधी दिला. अदिती सिंग या काँग्रेस पक्षाच्या आमदार आहेत. महत्वाची बाब म्हणजे त्या रायबरेलीमधून निवडून आल्या आहेत, जो काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधींचा लोकसभा मतदारसंघ आहे.

सध्या देशभरात सगळीकडेच राम मंदिर निधी संकलनाचे काम सुरु आहे. यामध्ये आजवर अनेक राम भक्तांनी मोठ्या प्रमाणात निधी दिलेला आहे. पण काँग्रेसच्या आमदार अदिती सिंग यांनी दिलेला ₹५१ लाखांचा निधी हा यातला एक विशेष भाग आहे. ‘राम ही एक काल्पनिक व्यक्तिरेखा आहे.’

असे सांगणाऱ्या काँग्रेस पक्षाच्या एका आमदाराने त्याच रामाचे मंदिर उभारण्यासाठी देणगी दिली आहे. त्यातही विशेष बाब म्हणजे त्या रायबरेली लोकसभा मतदार संघातील एका विधानसभा मतदार संघातून निवडून येतात. रायबरेली लोकसभा मतदार संघातून काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी या निवडून जातात. सोनिया गांधी यांनी अनेकवेळा राम मंदिर बांधणीला विरोध केला आहे. तर त्यांचे सुपुत्र आणि माजी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी ‘मंदिरात जाणारे बायकांची छेड काढतात’ असे विधान केले होते.

अदिती सिंग यांनी दिलेल्या या देणगीमुळे राजकीय वर्तुळात नवी चर्चा सुरु झाली आहे.

Exit mobile version