महाराष्ट्राचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून दापोलीत एक रिसॉर्ट बांधल्याचा आरोप भारतीय जनता पार्टीने केला आहे. भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी हा आरोप केला असून या संबंधी मुंबई भाजपाच्या शिष्टमंडळाने आज महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली. या भेटीत राज्यपालांनी महाराष्ट्र सरकारकडून यासंबंधी अहवाल मागवणार असल्याचे सांगितले आहे.
शिवसेनेचे नेते अनिल परब यांच्यावर गेले अनेक दिवस संकटांचे ढग दाटले आहेत. आधी सचिन वाझे यांनी एनआयएला दिलेल्या जबाबात अनिल परब यांनी वसुली करायला सांगितल्यास आरोप केला. तर दुसरीकडे भाजपाकडूनही अनिल परबांना सातत्याने लक्ष्य केले जाते. भाजपा नेते माजी खासदार किरीट सोमय्या हे यात आघाडीवर असतात. असाच एक नवा आरोप सोमय्या यांनी अनिल परब यांच्या बाबतीत केला आहे. दापोली येथील मुरुड येथे अनिल परब यांनी एक अनधिकृत रिसॉर्ट बांधले आहे असे सोमय्या यांचे म्हणणे आहे. साई रिसॉर्ट असे त्याचे नाव.
हे ही वाचा:
शिवसेना कोकणी माणसाला संपवायला निघाली आहे
काका काका ओरडणाऱ्या घरकोंबडयाची राज्यभर चर्चा
धडधडीत खोटे बोलण्याचे धाडस, हा बहुदा सामना इफेक्ट
हवेत गेलेले पाय जमिनीवर आलेलं बघून बरं वाटलं
या संदर्भात भारतीय जनता पार्टीच्या शिष्टमंडळाने शुक्रवार, २१ मे रोजी राज्यपालांची भेट घेतली असून अनिल परब यांची चौकशी करण्यासाठी एका विशेष पथकाची स्थापना करावी आणि मंत्रिमंडळातून त्यांची हकालपट्टी करावी अशी मागणी भाजपाने केली आहे. या विषयाचा गांभीर्याने विचार करण्याचे आश्वासन राज्यपालांनी दिले आहे या रिसॉर्ट घोटाळ्याचा अहवाल राज्य सरकारकडून मागवणार असल्याचे ही राज्यपालांकडून सांगण्यात आले आहे.
महाराष्ट्र राज्यपाल कोश्यारीजी मंत्री अनिल परबचा दापोली रिसॉर्ट घोटाळाचा अहवाल महाराष्ट्र सरकार कडून मागविणार pic.twitter.com/ZxshtRYQeG
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) May 21, 2021
या वेळी भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यासह खासदार गोपाळ शेट्टी, आमदार राम कदम, आमदार मिहिर कोटेचा, आमदार राहुल नार्वेकर, मुंबई भाजपाचे सरचिटणीस संजय उपाध्याय, युवराज मोरे आणि सिद्धार्थ शर्मा असे उपस्थित होते.