गुजरातमध्ये भाजप पुन्हा एकदा प्रचंड बहुमताने सत्तेत येणार आहे. सध्याचा कल बघता गुजरातमधील १८२ जागांपैकी भाजपने १५७ जागांवर आघाडी घेतली आहे. भाजपमध्ये विजयाचा जल्लोष सुरू झाला आहे. विजयाचा हा कल बघून भाजपने १२ डिसेंबर रोजी गांधीनगरमध्ये मुख्यमंत्रिपदाचा शपथविधी आयोजित करण्याची तयारी सुरु केली आहे.
नवनिर्वाचित आमदारांची येत्या ९ किंवा १० डिसेंबर रोजी पक्षाच्या प्रदेश कार्यालय कमलम येथे बैठक आयोजित करण्यात आली आहे. यानंतर १२ डिसेंबरला गांधीनगरमध्ये नव्या सरकारचा शपथविधी सोहळा होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. १२ डिसेंबर रोजी गांधीनगरमधील विधानसभा इमारतीच्या मागे असलेल्या हेलिपॅड मैदानावर मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा होणार आहे. या सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशिवाय भाजपचे अनेक दिग्गज सहभागी होणार असल्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष सीआर पाटील यांनी म्हटलं आहे.
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी हा भाजपचा मोठा विजय असल्याचे म्हटले आहे. गुजरातमधील भाजपचा विजय हा केवळ विजय नसून हा अभूतपूर्व आणि अकल्पनीय मोठा विजय आहे, असे ट्विट मुख्यमंत्री चौहान यांनी केले आहे. काँग्रेसचा सफाया! ते म्हणाले की, हे विकासाचे आणि जनकल्याणाचे वादळ आहे, त्यात काँग्रेससह इतर पक्षही वाहून गेले आहेत. आता राहुल गांधींना ‘काँग्रेस खोजो यात्रा’ काढावी लागणार नाही.
हे ही वाचा :
काँग्रेसचा गुजरातमध्ये दारुण पराभव
आपचा गुजरातमध्ये भाजपाला नाही तर काँग्रेसला फटका
भाजपाची काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात मुसंडी
…आणि सात वर्षांनंतर मृत महिला परतली
गुजरातने नेहमीच इतिहास घडवण्याचे काम केले
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपच्या यशाबद्दल राज्यातील जनतेचे अभिनंदन केले आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकास मॉडेलवरील लोकांच्या अतूट विश्वासाचा हा विजय असल्याचे सांगितले. गुजरातने नेहमीच इतिहास रचण्याचे काम केले आहे. गृहमंत्री शाह म्हणाले की, गुजरातने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाजपला अभूतपूर्व जनादेश दिला आह. पोकळ आश्वासने आणि तुष्टीकरणाचे राजकारण करणाऱ्यांना नाकारून विकास आणि लोककल्याण प्रत्यक्षात आणले आहे. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली आणि भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली मिळालेल्या या शानदार विजयाबद्दल मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, प्रदेशाध्यक्ष सीआर पाटील आणि गुजरात भाजप कार्यकर्त्यांचे अभिनंदन असे शहा यांनी म्हटले आहे.