महाविकास आघाडीतील अनेक नेते शिंदे-फडणवीस सरकार पाडण्याची वक्तव्य करत असतात. मध्यावधी निवडणूक लागणार अशीही वक्तव्य महाविकास आघाडीकडून करण्यात येत असतात. मविआच्या या टीकेला भाजपा नेते आणि सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ज्या दिवशी आम्ही जनतेची सेवा बंद करू त्या दिवशी हे सरकार पडेल, असं वक्तव्य मुनगंटीवार यांनी केलं आहे.
ज्या दिवशी आम्ही जनतेची सेवा करणं बंद करू, त्या दिवशी आम्हीही सरकार टिकावं ही इच्छा मनात धरणार नाहीत. सरकार कुणाच्या कुटुंबासाठी, परिवारासाठी, कुणाचा मुलगा मंत्री व्हावा, मुलगी खासदार व्हावा, यासाठी सरकार नाही. सरकार जनतेसाठी आहे. ज्या दिवशी आम्ही चुकू, त्या दिवशी सरकार रहावं हा अधिकार नाही, असं सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे.
२०१९ मध्ये शिवसेनेचे विचार बाजूला ठेऊन काँग्रेस- राष्ट्रवादीसोबत सरकार बनवलं. पण जनता परीक्षा घेत असते, लोकांना सगळं कळतं, मागच्या दोन सव्वा दोन वर्षात तुम्ही काय दिवे लावले? २०१९ मध्येही जनतेने तुम्हाला निवडणून दिलंच नव्हतं. पण आता २०२४ मध्ये दूध का दूध, पानी का पानी होईल, असं वक्तव्य सुधीर मुनगंटीवार यांनी केलं आहे.
हे ही वाचा :
उद्धव ठाकरे गटाला पडणार पुन्हा खिंडार, कोण कोण जातंय?
इंडोनेशिया भूकंपाने हादरले, शेकडो घरांची पडझड , १६२ ठार
फिजियोथेरेपीस्ट नव्हे हा तर रेपिस्ट
‘युवाशक्तीचा राष्ट्र उभारणीत वापर व्हावा’
शिंदे-फडणवीस सरकारच्या कामाबद्दल बोलताना मुनगंटीवार म्हणाले, नियमित कर्ज भरणाऱ्यांसाठी ५० हजार सरकारने दिले. जनहिताची कामे हे सरकार करत आहे. दिवाळीला आनंदाचा शिधा या सरकारने केले. एसटी, आरोग्य क्षेत्रात आम्ही सुविधा देत आहोत.