सर्वाधिक ४०३ सदस्य आले निवडून
महाराष्ट्रातील ३२ जिल्ह्यात झालेल्या १०६ नगरपंचायतींच्या निवडणुकांत भाजपाने दमदार कामगिरी केली. एकीकडे यात महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी ठरल्याचा दावा महाविकास आघाडीचे नेते करत असले तरी प्रत्यक्षात त्यातील तिन्ही पक्ष एकमेकांविरोधात लढले. भाजपाने मात्र एकट्याच्या जीवावर सर्वाधिक सदस्य या निवडणुकांत जिंकून आणले. त्यामुळे दोन वर्षांपूर्वी महाविकास आघाडीचा प्रयोग महाराष्ट्रात झाला असला तरी भाजपाची पाळेमुळे भक्कमच आहेत, हे स्पष्ट झाले आहे.
सायंकाळपर्यंत हाती आलेल्या १८०२ सदस्यांपैकी १५९० सदस्यांच्या निवडणूकीचे निकाल समोर आले. त्यात ४०४ जागा जिंकत भाजपाने पहिला क्रमांक मिळविला. त्याखालोखाल राष्ट्रवादी काँग्रेसला ३१८ जागा मिळाल्या तर तिसऱ्या क्रमांकावर शिवसेना आहे. त्यांचे ३०१ सदस्य जिंकले. काँग्रेस मात्र चौथ्या क्रमांकावर फेकला गेला असून त्यांच्या खात्यात २९१ सदस्य जमा होते.
एकूण ३२ जिल्ह्यात झालेल्या १०६ नगरपंचायतींपैकी ९७ नगरपंचायतींचे निकाल हाती आले त्यात भाजपाला दुसरे स्थान मिळाले तर राष्ट्रवादीने पहिला क्रमांक मिळविला. पण राष्ट्रवादी आणि भाजपा यांच्यात फार फरक नव्हता. राष्ट्रवादीने २७ नगरपंचायती जिंकल्या तर भाजपाच्या पारड्यात २४ नगरपंचायती होत्या. त्याखालोखाल तिसऱ्या क्रमांकावर काँग्रेस असून त्यांची संख्या २१ आहे तर शिवसेना चौथ्या क्रमांकावर होती. त्यांनी १८ नगरपंचायती जिंकल्या.
हे ही वाचा:
अपहरण झालेला ‘डुग्गू’ अखेर सापडला
राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचा कार्यकाळ तीन वर्षांसाठी वाढणार
गोव्यात काँग्रेसला महाविकास आघाडी झेपली नाही!
जगातील सर्वात वयोवृद्धाचा वयाच्या ११२ व्या वर्षी मृत्यू…
यात आता महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी झाल्याचा दावा महाविकास आघाडीचे नेते करू लागले आहेत. तिघांचे एकत्र सदस्यसंख्या मोजून ती कशी सर्वाधिक आहे, हे दाखविण्याचा आता प्रयत्न केला जात आहे. प्रत्यक्षात हे शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी हे तिन्ही पक्ष एकमेकांविरोधात लढले आहेत.