लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात प्रचार सभांचा धडाका सुरु आहे.या प्रचार सभांच्या माध्यमातून सत्ताधारी आणि विरोधांकडून आरोपही तितकेच तेजीत आहेत.प्रचार सभेदरम्यान उबाठा पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर टीका केली होती.उद्धव ठाकरेंच्या या टीकेला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उत्तर दिलं आहे.बावनकुळे यांनी ट्विट करत उद्धव ठाकरे यांचा ‘महानालायक’ म्हणून उल्लेख केला आहे.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ट्विट करत लिहिले की, महाराष्ट्राचे महानालायक उद्धव ठाकरे यांचा आदरणीय मोदीजी आणि देवेंद्रजींबद्दल बोलताना आज पुन्हा तोल गेलाच.उद्धव ठाकरेंनी देवेंद्रजींच्या नावानं कितीही शिव्याशाप दिले तरी जनता जनार्दनाचे आशीर्वाद देवेंद्रजींसोबत आहेत.
खरं तर समर्थ रामदास स्वामींनी मुर्खांची लक्षणं सांगतांना लिहून ठेवलंय.
तोंडाळासीं भांडों नये | वाचाळासीं तंडोंनये |
संतसंग खंडूं नये | अंतर्यामीं ||||
हे ही वाचा:
इजिप्तमध्ये इस्लामवाद्यांनी ख्रिश्चनांची घरे जाळली
शरद पवार कृषिमंत्री असताना काय केले?
नाशिक: एसटीची ट्रकला धडक, १० जण ठार!
‘मोदी पाठून हल्ला करत नाही जे करतो ते उघडपणे करतो’
पण उद्धव ठाकरेंचा वाचाळपणा काही थांबायचं नाव घेत नाही. अडीच वर्षे घरात बसून काढली, बोलण्यासाठी एक विकासकामही केलं नाही. मग लोकांसमोर गेल्यावर अशी मुक्ताफळे उधळण्याची वेळ येते. उद्धव ठाकरे हे आता नैराश्याच्या गर्तेत गेले आहेत. त्यांची ही वायफळ बडबड त्यांच्या पक्षातील उमेदवारांना आणि नेत्यांना सुद्धा नकोशी झाली आहे.
उद्धव ठाकरे यांनी आता एक लक्षात ठेवावं की, तुम्ही मोदीजी आणि देवेंद्रजींबद्दल कितीही वायफळ बडबड करा. ४ जून रोजी जनता तुम्हाला तोंड दाखवायलाही जागा ठेवणार नाही.