विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या आरोपावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. निवडणुकीत मतं मिळविण्यासाठी काँग्रेस किती खालच्या पातळीला जाणार? भाजपाला विरोध करण्यासाठी तुम्ही २६/११ मुंबई हल्ल्यातील दहशतवादी अजमल कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे.
२६/११ च्या मुंबई हल्ल्यामध्ये पोलीस अधिकारी हेमंत करकरे यांना वीर मरण आले होते. परंतु, त्यावेळेच्या हल्ल्यात हेमंत करकरे यांना लागलेली गोळी ही दहशतवादी अजमल कसाबच्या बंदुकीची नसून एका पोलीस अधिकाऱ्याची होती आणि तो अधिकारी आरएसएसशी संबंधित होता.या प्रकरणातील संपूर्ण पुरावे हे वकील उज्ज्वल निकम यांनी लपवले, खरा देशद्रोही निकम हे आहेत आणि अशा देशद्रोह्याला भाजप पाठीशी घालत आहे का?, असा सवाल वडेट्टीवार यांनी केला होता. वडेट्टीवार यांच्या सवालावर भाजपचे नेते बावनकुळे यांनी उत्तर देत त्यांचा चांगलाच समाचार घेतला आहे.भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी यांनी ट्विटकरून उत्तर दिले आहे.
बावनकुळेंनी ट्विट करत लिहिले की, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी पुन्हा एकदा अकलेचे तारे तोडत पाकिस्तानधार्जिणी भूमिका घेतली. शहीद हेमंत करकरे यांच्यावर चाललेली गोळी पाकिस्तानी दहशतवादी अजमल कसाबची नव्हती असा जावईशोध वडेट्टीवार यांनी लावला.
विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी पुन्हा एकदा अकलेचे तारे तोडत पाकिस्तानधार्जिणी भूमिका घेतली. शहीद हेमंत करकरे यांच्यावर चाललेली गोळी पाकिस्तानी दहशतवादी अजमल कसाबची नव्हती असा जावईशोध वडेट्टीवार यांनी लावला.
निवडणुकीत मतं मिळविण्यासाठी काँग्रेस किती खालच्या पातळीला जाणार?… pic.twitter.com/MHne6oawNG
— Chandrashekhar Bawankule (Modi Ka Parivar) (@cbawankule) May 5, 2024
निवडणुकीत मतं मिळविण्यासाठी काँग्रेस किती खालच्या पातळीला जाणार? भाजपाला विरोध करण्यासाठी तुम्ही २६/११ मुंबई हल्ल्यातील दहशतवादी अजमल कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा.
हे ही वाचा:
दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्गावर भीषण अपघात, सहा जणांचा मृत्यू!
उपदेश राणा, नुपूर शर्मा यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक
“नेपाळच्या नोटेवर भारताच्या तीन भागांचा समावेश असणारा नकाशा छापण्याचा निर्णय हा एकतर्फी”
जम्मू काश्मीरच्या पुंछमध्ये हवाई दलाच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला!
जेव्हापासून मोदीजी सत्तेत आले दहशतवाद्यांचं कंबरडं मोडलं पण आज काँग्रेस दहशतवाद्यांसाठी अश्रू गाळत आहेत. महाराष्ट्रात मविआ सत्तेत असताना याकुबच्या कबरीवर सुशोभीकरण केलं आता कसाबचा पुळका आला आहे.काँग्रेस आणि वडेट्टीवार यांच्या पाकधार्जिण्या भूमिकेबद्दल जनता धडा शिकवल्या शिवाय राहणार नाही, असे बावनकुळे म्हणाले आहेत.