गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यासाठी भाजपाचे आंदोलन

गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यासाठी भाजपाचे आंदोलन

सचिन वाझे प्रकरणात पहिल्यापासून आक्रमक असलेल्या भाजपाने परमबीर सिंह यांच्या लेटर बॉम्ब नंतर गृहमंत्र्यांच्या विरोधात अधिक आक्रमक भूमिका घेतली आहे. गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे यासाठी भाजपाने राज्यभरात आंदोलन करायला सुरूवात केली आहे.

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून गृहमंत्र्यांनी शंभर कोटी दरमहिन्याला वसुल करण्याचे लक्ष्य दिले होते असा गंभीर आणि धक्कादायक आरोप केला आहे. गृहमंत्र्यांवर इतक्या गंभीर स्वरूपाचे आरोप झाल्यामुळे राज्यात विविध ठिकाणी भाजपाने गृहमंत्र्यांच्या विरोधात आंदोलन करायला सुरूवात केली आहे. मुंबईच्या दादर मध्ये त्याबरोबरच नागपूरमध्ये देखील आंदोलन करायला सुरूवात केली आहे.

हे ही वाचा:

परमबीर सिंग यांच्या पत्राला अनिल देशमुखांचे पत्रकातून उत्तर

नारायण राणे यांचे ठाकरे सरकारवर टिकास्त्र; राष्ट्रपती राजवटीची केली मागणी

या प्रकरणानंतर भाजपाने गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची देखील मागणी केली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीटरवरून गृहमंत्र्यांना बडतर्फ करण्यात यावे किंवा त्यांचा राजीनामा घेण्यात यावा असे ट्वीट देेखील केले होते. त्याबरोबरच महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यावर अशा प्रकारचे आरोप होण्याचा हा पहिला प्रकार असल्याचे देखील म्हटले होते. नारायण राणे यांनी देखील ट्वीट करून गृहमंत्री अनिल देशमुख यांना लक्ष्य केले होते. त्यांनी राष्ट्रपती राजवट लावण्यात यावी अशी मागणी देखील केली होती.

या बरोबरच भाजपाचे नेते आमदार अतुल भातखळकर यांनी देखील या आंदोलनांसंबंधी ट्वीट करून माहिती दिली आहे.

 

Exit mobile version