संबित पात्रा केजरीवालांवर बरसले

संबित पात्रा केजरीवालांवर बरसले

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय प्रवक्ते डॉ.संबित पात्रा यांनी टीकास्त्र डागले आहे. केजरीवाल यांनी केंद्र सरकारवर केलेल्या टीकेला पात्रा यांनी प्रत्युत्तर दिले आहे. यावेळी डॉ.संबित पात्रा यांनी केजरीवाल यांच्या राजकारणाचा समाचार घेतला.

देशात एकीकडे कोविडचा हाहाकार सुरू असतानाच या विषयावरून तेवढेच राजकारण टापलेले बघायला मिळत आहे. तिकडे केंद्र सरकार विरुद्ध राज्य सरकार असा संघर्ष पेटला असून विविध राज्य सरकारे केंद्र सरकारकडे बोट दाखवत टीका करताना दिसत आहेत यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल आघाडीवर असतात.

अशाच प्रकारे केंद्र सरकारवर टीका करताना अरविंद केजरीवाल यांनी थेट पाकिस्तानला मध्ये आणले. उद्या जर पाकिस्तान सोबत युद्ध झाले तर त्यावेळी उत्तर प्रदेशला वेगळा रणगाडा किंवा दिल्ली आपला न्यूक्लियर बॉम्ब तयार करणार आहे का? असा विचित्र प्रश्न विचारत केजरीवाल यांनी केंद्र सरकारवर टीका केली होती. केजरीवालांच्या याच टीकेला राष्ट्रीय प्रवक्ते डॉ.संबित पात्रा यांनी पत्रकार परिषद घेत उत्तर दिले आहे.

हे ही वाचा:

भारताने पार केला २० कोटी लसीकरणाचा टप्पा

ग्लोबल टेंडरच्या नावावर लस घोटाळा?

रा.स्व.संघाच्या सेवाकार्याने कम्युनिस्टांना पोटदुखी

नालेसफाई, कचरा सफाईच्या नावाखाली तिजोरीचे सफाई

काय म्हणाले डॉ.संबित पत्रा?
बुधवार, २६ मे रोजी संध्याकाळी व्हर्च्युअल माध्यमातून पत्रकार परिषदेला संबोधित करताना डॉ.संबित पात्रा यांनी अरविंद केजरीवाल यांच्या आरोपांची लक्तरे टांगली. आपल्या पत्रकार परिषदेत संबित पात्रा असे म्हणाले की, आज आपण दोन वेळा अरविंद केजरीवाल यांना टीव्हीवर पाहिले आणि दोन्ही वेळा ते असत्य, भ्रम आणि श्रेयवादाचे राजकारण करताना दिसले. सध्याच्या परिस्थितीत अशा प्रकारचे राजकारण करणे योग्य ठरणार नाही.

लसीकरणाच्या मुद्द्यावरून केजरीवालांना लक्ष्य करताना संबित पात्रा म्हणाले, केंद्र सरकारने २० करोडपेक्षा अधिक लसी या वेगवेगळ्या राज्यांना वितरित केल्या आहेत. आजच्या घडीला दिल्लीत दिड लाखापेक्षा अधिक लसी उपलब्ध आहेत. या लसी नागरिकांना देण्याची सोय केजरीवाल यांनी करावी. दर दिवशी दोन ते तीन पत्रकार परिषदा घेत केजरीवाल या मुद्द्याचे राजकारण करत आहेत. काही काळापूर्वी केजरीवाल यांनी स्वतः असे म्हटले होते की दिल्लीला स्वतंत्र राहू दे. आम्ही तीन महिन्यात संपूर्ण दिल्लीचे लसीकरण पूर्ण करू. पण जेव्हा केजरीवालांना स्वतंत्रता दिली जाते तेव्हा ते म्हणतात आम्हाला लस देण्याच्या बाबतीत स्वातंत्र्य का दिले गेले? हा तर केंद्राचा विषय आहे.

केजरीवाल यांनी आपल्या पत्रकार परिषदेत म्हटले की आज युद्धजन्य स्थिती आहे. त्यात कोणतेच दुमत नाही. कोरोनाच्या पहिल्या लाटेतही युद्धजन्य परिस्थिती होती आणि दुसऱ्याला लाटेतही आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेतही हे युद्ध भारत जिंकला होता आणि दुसऱ्या लाटेतही आपण हे युद्ध जिंकू असे डॉक्टर पात्रा म्हणाले.

केजरीवाल यांच्या म्हणण्यानुसार पाकिस्तान सोबत युद्ध होईल तेव्हा उत्तर प्रदेश स्वतःचे रणगाडे आणि दिल्ली अनुबॉम्ब बनवणार का? पण दुःख तर याचे वाटते की जेव्हा भारत देश सर्जिकल स्ट्राइक करतो तेव्हा त्याचे पुरावे तुम्ही मागता. त्यावेळीही तुम्ही न चुकता त्याचे फक्त राजकारण करता असा हल्ला संबित पात्रा यांनी चढवला आहे.

काल अरविंद केजरीवाल म्हणाले की ते कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी आम्ही पूर्णपणे सज्ज आहोत. ऑक्सीजन सिलेंडर, ऑक्सीजन प्लांट यांची व्यवस्था करत आहोत. हॉस्पिटलमध्ये बेडची व्यवस्था करत आहोत. पण मग जेव्हा कोरोनाची दुसरी लाट आली तेव्हा केजरीवाल यांनी असे का नाही केले? असा सवाल संबित पात्रा यांनी विचारला आहे.

Exit mobile version