24 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरराजकारणशेतकऱ्यांचे मरण हेच का महाविकास आघाडी सरकारचे धोरण

शेतकऱ्यांचे मरण हेच का महाविकास आघाडी सरकारचे धोरण

Google News Follow

Related

राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आल्यापासून शेतकर्‍यांना चांगली वागणुक मिळत नाही. सरकारची सारी धोरणे ही शेतकरी विरोधी असून हा वर्ग जणु काही आमचा शत्रुच आहे अशा प्रकारची सापत्न वागणूक त्यांना मिळत आहे. पंढरपुर येथे सुरज जाधव या तरूण शेतकर्‍याने केवळ सरकारच्या आडमुठेपणामुळे आत्महत्या केली असुन याला सर्वस्वी महावितरण कंपनी आणि राज्याचे ऊर्जामंत्री हेच जबाबदार असल्याची जोरदार टिका भाजपाचे राज्य प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी केली.ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी देखिल त्यांनी केली.

सोलापुर जिल्ह्यातील मगरवाडीचे रहिवाशी असलेल्या सुरज जाधव या २२ वर्षांच्या तरूण शेतकर्‍याने फेसबुक लाईव्ह करीत मी आत्महत्या का करतो ? याला राज्य सरकारचे धोरणच कारणीभूत आहे.म्हणून शेतात विष प्राशन केले.मुळात हे सरकार सत्तेवर आल्यापासून शेतकर्‍यांना मिळणार्‍या सवलती बंद झाल्या.कुठलेही अनुदान मिळत नाही.विमा मिळत नाही.अतिवृष्टीमुळे पिकांचे आणि शेतीचे नुकसान झालं तरी भरीव आर्थिक मदत नाही.

हे ही वाचा:

मणिपूरमध्ये नेत्याच्या घरावर बॉम्ब हल्ला

युद्ध थांबवण्यासाठी रशियाने युक्रेनसमोर ठेवल्या या अटी

…आणि लिबियातून भारतीयांची जलदगतीने सुटका केल्याच्या बतावणीत काँग्रेस मग्न

रशिया काही तास बॉम्बवर्षाव करणार नाही…हे आहे कारण!

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना राज्यातील शेतकर्‍यांच्या नावावर दिवसाआड बँकेत वेगवेगळ्या स्वरूपाचे अनुदान पडायचे.रात्री अपरात्री मोबाईलचा मॅसेज वाजला की,पैसे पडले ही ओळख तयार झाली होती.मात्र शेतकरी विरोधी सरकार सत्तेवर आल्यापासून एक दमडी ही शेतकर्‍यांना मिळत नाही. कोरोना सारख्या संकटामुळे अगोदरच शेती उद्योग धोक्यात आला.मागच्या वर्षी पाऊस प्रचंड झाला. पाण्याची पातळी वाढली पण,शेतकर्‍यांना उपसा करण्यासाठी वीज वेळेवर नाही.सतत पुरवठा होत नाही. एवढेच काय आव्वाच्या सवा बीले देवून रझाकारा सारखी वसुली करायची आणि ज्या शेतकर्‍यांची वीज बाकी मिळाली नाही त्यांची कनेक्शन बंद करण्याची भूमिका ठाकरे सरकारने घेतली. ज्यामुळे शेतकरी आज प्रचंड वैतागुन गेलेला आहे. सरकारच्या धोरणाला कंटाळून जाधव नावाच्या तरूण शेतकर्‍याने केलेली आत्महत्या ही दुर्दैवी असून याला महावितरण कंपनी आणि राज्याचे ऊर्जामंत्री हेच जबाबदार असल्याचा गंभीर आरोप राम कुलकर्णी यांनी केला.

खरे तर महावितरण कंपनीचे अधिकारी आणि ऊर्जामंत्र्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे. सरकार कितीही शेतकर्‍यांच्या विरोधात भूमिका घेत असले तरी राज्यातील शेतकर्‍यांनी रस्त्यावर उतरून संघर्ष करण्याची गरज आहे. आत्महत्या सारख्या मार्गाचा कुणीही अवलंब करू नये असे आवाहन देखिल भाजपा प्रवक्ते कुलकर्णी यांनी केले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा