भारतात विविध राज्यात झालेल्या पोटनिवडणुकात इंडी आघाडीला १३ पैकी १० जागी यश मिळाले आणि भाजपाला २ जागी निवडून येता आले. यानंतर इंडी आघाडी समर्थकांमध्ये उत्साह दिसला. अनेकांनी इंडी आघाडीची जादू चालू लागल्याचे म्हणायला सुरुवात केली. त्याला उत्तर देताना भाजपाचे प्रवक्ते अमित मालविय यांनी हे इंडी आघाडीचे यश नसून ज्या जागा त्यांनी जिंकल्या आहेत, त्या भाजपाला पराभूत करून जिंकलेल्या नाहीत, तर त्या जागा त्यांच्याच होत्या, त्यांनी जिंकल्या, असे स्पष्टीकरण दिले आहे.
मालवीय यांनी आपल्या एक्स अकाऊंटवरून यासंदर्भात ट्विट केले आहे. ते म्हणतात की, विरोधी पक्षांनी जो उत्साहाचा फुगा फुगविला आहे, त्याला मी टाचणी लावू इच्छितो. ज्या १३ पैकी १० जागा इंडी आघाडीने जिंकल्या आणि भाजपाला दणका दिला असे म्हटले जात आहे. त्यातील ९ जागा तर भाजपाच्या नव्हत्याच. हिमाचल प्रदेशमध्ये ज्या तीन जागा त्यांनी जिंकल्या तिथे आधी अपक्षच निवडून आले होते. उत्तराखंडमध्ये काँग्रेसने आपल्या जागा राखल्या आहेत.
मालवीय म्हणतात की, मध्य प्रदेशात मात्र काँग्रेसकडे असलेली जागा आम्ही जिंकली. पण बंगालमध्ये मात्र निवडणुकाच निष्पक्षपणे पार पडल्या नाहीत. पंजाबमध्ये आम आदमी पक्षाने आपली जागा जिंकली तर तामिळनाडूत डीएमकेनेही आपलीच जागा पुन्हा जिंकली आहे. त्यामुळे जे लागलेले निकाल आहेत तिथे जे पक्ष आधी होते त्यांचेच उमेदवार जिंकलेले आहेत.
हे ही वाचा:
काँग्रेस नेत्याने पसरवली खोटी बातमी
मणिपूरच्या जिरीबाममध्ये दहशतवादी हल्ला, एक जवान हुतात्मा !
तब्बल ४६ वर्षानंतर जगन्नाथ पुरी मंदिराचा खजिना उघडला !
अनंत अंबानीने गिफ्ट केली शाहरुख, रणवीरसह खास सेलिब्रिटिंना २ कोटींचे घड्याळ !
बंगालमध्ये टीएमसीने एक जागा जी त्यांचीच होती ती जिंकली. बंगालमध्ये तृणमूलचे विजयी उमेदमवार मुकुटमणी अधिकारी आणि कृष्णा कल्याणी हे भाजपाचेच याआधीचे आमदार होते. ते आता तृणमूलमध्ये गेले आहेत. त्यांनी त्या जागा भाजपाच्या उमेदवारांना पराभूत करून जिंकल्या आहेत. बागदा या ठिकाणी तृणमूलचे विश्वजीत दास हे २०२१मध्ये आमदार होते आता मधुपर्ण ठाकूर या तृणमूलच्या उमेदवाराने ही जागा जिंकली आहे. त्यामुळे इंडी आघाडीने विजय मिळविला यात काहीही तथ्य नाही.
त्याआधी, राहुल गांधी यांनी ट्विट करत ७ राज्यातील निकालांनी हे स्पष्ट केले की, भाजपाची सद्दी संपली आहे.
या पोटनिवडणुकीत पश्चिम बंगालमध्ये चार जागा तृणमूलने जिंकल्या. हिमाचल प्रदेशात तीन जागा अपक्षांनी जिंकल्या तर उत्तराखंडात दोन जागा काँग्रेसने आणि तामिळनाडूत डीएमकेने एक जागा जिंकली. त्यावरून इंडी आघाडी ही कशी आता आपले बस्तान बसवत आहे, असा तर्क मांडला जात आहे.