दिल्ली भाजपाचे प्रवक्ते ताजिंदरसिंग बग्गा यांना ताब्यात घेण्यासाठी पंजाब, दिल्ली आणि हरयाणा पोलिसांत चांगलाच राडा घातला गेला. दिल्लीतून पंजाब पोलिसांनी अटक केली. जवळपास १० ते १२ कारचा ताफा आणि त्यात ५० पेक्षा अधिक पोलिस दिल्लीत दाखल झाले आणि भाजपाचे नेते बग्गा यांच्या घरात शिरले. त्यांनी बग्गा यांना ताब्यात घेतले.
पोलिसांनी बग्गा यांच्या वयोवृद्ध वडिलांनाही धक्काबुक्की केली. तसेच बग्गा यांना अटक करण्यात आल्याचे वॉरंटही पोलिसांनी दाखविले नाही.
पंजाब पोलिसांनी बग्गा यांना ताब्यात घेतल्यावर दिल्ली पोलिसांनी पंजाब पोलिसांविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल केला. पंजाब पोलिसांनी बग्गा यांना ताब्यात घेऊन ते हरयाणा मार्गे पंजाबात जात असताना दिल्ली पोलिसांनी बग्गा यांना पुन्हा दिल्लीत आणले.
दिल्लीत पोलिस हे केंद्र सरकारच्या अखत्यारित आहेत तर पंजाबमध्ये आम आदमीचे सरकार असल्यामुळे तिथे त्यांच्या आदेशानुसार पोलिस काम करत आहेत. हरयाणात भाजपाचे सरकार आहे, त्यामुळे या तीन पोलिसांत संघर्ष पाहायला मिळाला.
पंजाब पोलिस जेव्हा बग्गा यांना घेऊन हरयाणातून जात होते तेव्हा हरयाणा पोलिसांनी त्यांना रोखले. बग्गा यांना जबरदस्तीने नेले जात असल्याबद्दल हरयाणा पोलिसांनी चौकशी केली. त्यानंतर दिल्ली पोलिस कुरुक्षेत्रला पोहोचली आणि त्यांनी बग्गा यांचा ताबा पंजाब पोलिसांकडून घेतला.
हे ही वाचा:
‘कान्स फिल्म फेस्टिव्हल’मध्ये तीन मराठी सिनेमांची वर्णी
१५ मे रोजी धडाडणार देवेंद्र फडणवीसांची तोफ
‘न्यायालयाने केला ठाकरे सरकारच्या लोकशाहीविरोधी धोरणांचा पर्दाफाश केला’
केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले; पंतप्रधान मोदींच्या नावाने पहिला रुद्राभिषेक
काश्मीर फाइल्स हा चित्रपट बनावट असल्याचे विधान दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी केल्यानंतर त्यावर बग्गा यांनी टीका केली होती. त्यानंतर पंजाब पोलिसांनी बग्गा यांच्याविरोधात एफआयआर दाखल केला.
नंतर तो एफआयआर रद्द करण्यात आला आणि आम आदमी पार्टीच्या पंजाब सरकारने विशेष तपास पथकाची स्थापना केली. त्यांनी बग्गा यांच्या ट्विटचा तपास सुरू केला.
यासंदर्भात भाजपाचे प्रवक्त अमित मालवीय यांनी ट्विट करत या घटनेचा निषेध केला आहे.