भाजपाचे नगरसेवक फुटणार हा शिवसेनेचा फुसका बार आहे आणि असे फुसके बार सोडण्याची त्यांची जुनी सवय आहे.आता त्यांचा पक्ष उपऱ्यांच्या जोरावर चालत असून बाळासाहेबांच्या शिवसैनिकांना डावलले जात आहे.गेले २५ वर्षे युतीत असताना त्यांना जेव्हा जेव्हा उमेदवार सापडत नव्हते, तेव्हा आम्ही त्यांना लोकसभेसाठी, विधानसभेसाठी आणि महापालिकेसाठी सुद्धा उमेदवार दिलेले आहेत याची आठवण करून देत स्वबळावर लढण्याची भाषा करणाऱ्यांना महापालिकेतही सक्षम उमेदवार सापडत नसल्यामुळे भाजप नगरसेवक फोडण्याची भाषा करत आहेत, असा सणसणीत टोला भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ता भालचंद्र शिरसाट यांनी सत्ताधार्यांना लगावला.
शिवसेनेला मतदारसंघात उमेदवार मिळत नसल्यामुळेच पालघर लोकसभा मतदारसंघासाठी राजेंद्र गावित, शिर्डी लोकसभा मतदार संघासाठी सदाशिव लोखंडे, मध्य दक्षिण मुंबईसाठी विद्याधर गोखले, सातारा कोरेगाव चे आमदार महेश शिंदे, ताडदेव महापालिका प्रभागासाठी अनिल सिंग, अंधेरीतील नगरसेविका संध्या सुनिल यादव असे ३५ ते ४० उमेदवार वेळोवेळी दिलेले आहेत.आताही शिवसेनेला योग्य उमेदवारांची वानवा आहे म्हणूनच ते फोडाफोडीची भाषा करित आहेत. भाजपाचा एकही नगरसेवक हिंदुत्व सोडलेल्या शिवसेनेकडे ढुंकूनही पाहणार नाही, असा विश्वास भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ता भालचंद्र शिरसाट यांनी व्यक्त केला.
हे ही वाचा:
भावना गवळींना ईडीचा दुसरा समन्स!
शिवसेना-राष्ट्रवादीची ठाण्यात ‘लसी’ खेच
शिवसेनेचे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी भाजपाचे १५-१६ नगरसेवक डिसेंबरपर्यंत शिवसेनेत दाखल होतील असा दावा केला होता. त्यावर भाजपाकडून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या.