संसदेतील कार्यक्रमात काँग्रेसच्या राजकुमारांचा अहंकार दिसला

भाजप नेते अमित मालवीय यांची राष्ट्रपती मुर्मू यांना अभिवादन न करणाऱ्या राहुल गांधींवर टीका

संसदेतील कार्यक्रमात काँग्रेसच्या राजकुमारांचा अहंकार दिसला

संसदेत मंगळवार, २६ नोव्हेंबर रोजी संविधान दिनानिमित्त कार्यक्रम पार पडला. यावेळी राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, विरोधी पक्ष नेते असे सर्व मान्यवर उपस्थित होते. या समारंभात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अध्यक्ष द्रौपदी मुर्मू यांचा अनादर केल्याचा आरोप भाजपाने केला आहे. याशिवाय राष्ट्रगीताचाही अपमान केल्याचा गंभीर आरोप भाजपाने केला आहे. भाजप नेते अमित मालवीय यांनी या कार्यक्रमाचे दोन व्हिडीओ शेअर करत राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे.

एका व्हिडीओमध्ये राष्ट्रगीत सुरू असताना राहुल गांधी आजूबाजूला पाहताना दिसत आहेत. इतर सर्व नेते राष्ट्रगीत ऐकत सरळ किंवा खाली पाहत आहेत. “राहुल गांधी ५० सेकंदही स्थिर उभे राहू शकत नाहीत आणि अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांवर अत्यंत घृणास्पद टिप्पणी करण्याचे धाडस त्यांच्याकडून होते,” असे म्हणत अमित मालवीय यांनी राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे.

दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये सर्व मान्यवर नेते मंचावर उभे असताना एकीकडे राहुल गांधी मात्र खुर्चीवर बसताना दिसत आहेत. तर, आणखी एका व्हिडीओमध्ये राहुल गांधी हे राष्ट्रपती मुर्मू यांना अभिवादन न करताच स्टेजवरून थेट निघून जाताना दिसत आहेत. इतर नेत्यांनी राष्ट्रपती मुर्मू यांचे स्वागत केले. यावर मालवीय म्हणाले की, “राहुल गांधी यांना एवढा अहंकार आहे की त्यांनी राष्ट्रपती मुर्मू यांना अभिवादनही केले नाही. याचे कारण केवळ इतकेच आहे की त्या आदिवासी समाजाच्या महिला आहेत आणि राहुल गांधी हे काँग्रेसचे राजकुमार आहेत? किती नीच मानसिकता आहे ही?” अशी टीका मालवीय यांनी केली आहे. पुढे ते असेही म्हणाले आहेत की, “काँग्रेस नेहमीच द्रौपदी मुर्मू यांचा अनादर करते कारण त्या सर्वोच्च पदावर विराजमान झालेल्या पहिल्या आदिवासी महिला आहेत. राहुल गांधी आणि कुटुंबीय एससी, एसटी आणि ओबीसींचा तिरस्कार करतात हे यातून दिसून येते,” अशी टीका अमित मालवीय यांनी केली आहे.

हे ही वाचा : 

आम्ही कायद्याची छाननी करण्यासाठी, विरोधी पक्षाची भूमिका बजावणार नाही!

राज्यघटना लोकशाहीचा पाया असून संविधान देशासाठी सर्वात पवित्र ग्रंथ

चंदीगडमधील दोन क्लबबाहेर मोटारसायकलवरून आलेल्या दोघांनी फेकली स्फोटके

पुन्हा एकदा रश्मी शुक्ला यांच्याकडे राज्याच्या पोलीस महासंचालक पदाचा पदभार

राहुल गांधींच्या या कृतीमुळे आता सोशल मीडियावरही त्यांच्यावर टीका केली जात आहे. त्यांचे हे व्हिडीओ व्हायरल झाले असून काहींनी याला अहंकार म्हटले आहे तर, काहींनी याला महाराष्ट्र निवडणुकीत काँग्रेसच्या पराभवानंतर झालेल्या निराशेमुळे त्यांचे हे वागणे असल्याचे म्हटले आहे.

Exit mobile version