23 C
Mumbai
Thursday, December 26, 2024
घरराजकारणआसाममध्ये भाजपाचा दणदणीत विजय निश्चित

आसाममध्ये भाजपाचा दणदणीत विजय निश्चित

Google News Follow

Related

आसाममध्ये विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू असून सुरुवातीचे कल हाती आले आहेत. १२६ जागा असलेल्या विधानसभेसाठी सुरु असलेल्या मतमोजणीमध्ये भाजप आणि मित्रपक्षांनी ७५ जागांवर आघाडी घेऊन बहुमताकडे वाटचाल सुरू केली आहे तर विरोधी पक्ष काँग्रेस ४२ जागांवर आघाडीवर आहे.

सुरुवातीच्या कलांनुसार एनडीएचे मुख्यमंत्री असलेले सर्वानंद सोनोवाल हे आपली सत्ता कायम ठेवतील असं दिसतंय. आम्हाला जनतेने आशीर्वाद दिला असून आम्हीच सरकार बनवणार हे स्पष्ट आहे असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

आसाममध्ये २०१६ च्या विधानसभा निवडणुकीत युपीएला २६ आणि एनडीएला  ८६ जागा मिळाल्या होत्या. इतर पक्षांना १४ जागा मिळाल्या होत्या.

आसामला २७ मार्च, १ एप्रिल आणि ६ एप्रिल असे तीन टप्प्यात मतदान घेण्यात आले होते. आसाममध्ये एनडीए आणि यूपीएमध्ये लढत होती. कॉंग्रेस येथे महाआघाडी  करून उतरली होती. एआईयूडीएफ, बीपीएफ, सीपीआई, सीपीएम, सीपीआई (माले), आंचलिक गण मोर्चा (एजीएम), आरजेडी, आदिवासी नॅशनल पार्टी (एएनपी) आणि जिमोचयन (देओरी) पीपुल्स पार्टी (जेपीपी)  सोबत होते.

हे ही वाचा:

तामिळनाडूत सत्ताबदलाचे वारे?

बेळगावात भाजपा पुढे

नंदिग्राममध्ये ममता बॅनर्जी पिछाडीवर

निवडणूक निकालांच्या आधीच काँग्रेसने काढला पळ

भाजपाचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल आणि मंत्री हिमांता बिस्वा सर्मा यांनी आसाममध्ये जोरदार प्रचार केला होता. यावेळी प्रचारादरम्यान दोन्ही नेत्यांनी, सत्ता मिळाल्यावर भाजपचा मुख्यमंत्री कोण असेल? या प्रश्नावर उत्तर देणं टाळलं होतं.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा