27 C
Mumbai
Saturday, November 16, 2024
घरराजकारणआसाममध्ये एनडीएचे जागावाटप निश्चीत

आसाममध्ये एनडीएचे जागावाटप निश्चीत

Google News Follow

Related

आसामच्या विधानसभा निडणुकीचं बिगूल वाजताच भाजपाने जागा वाटपाचा तिढाही सोडवला आहे. भाजपाने मित्रपक्षांबरोबर जागा वाटपाचा फॉर्म्युला तयार केला आहे. त्यानुसार या निवडणुकीत भाजपा, एजीपी आणि यूपीपीएल एकत्रित निवडणूक लढवणार आहेत. आसाम गण परिषद (एजीपी) २६, यूपीपीएल ८ तर भाजपा ९२ जागांवर लढणार आहे.

आसाम विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाने गुरुवारी या फॉर्म्युल्याला अंतिम स्वरुप दिलं आहे. काल भाजपा मुख्यालयात पाच राज्यांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठक झाली होती. या बैठकील पंतप्रधान नरेंद्र मोदीही उपस्थित होते. तर मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल हे भाजपाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी गेले होते. यावेळी आसामच्या निवडणुकीवर चर्चा करण्यात आली. या बैठकीला मंत्री हिमांता बिस्व सरमा, आसाम प्रभारी बैजयन्त पांडा आणि सह प्रभारी पवन शर्माही उपस्थित होते.

हे ही वाचा:

सीएएवरून राहुल गांधींची आसाममध्ये मुक्ताफळे

आसाम विधानसभेत एकूण १२६ जागा आहे. २०१६ सालच्या विधानसभा निवडणुकीत भाजपला ६० जागांवर विजय मिळाला होता. गेल्या निवडणुकीत बोडोलँड पीपल्स फ्रंट, (बीपीएफ) एजीपी आणि भाजपाने  युती करून निवडणूक लढवली होती. त्यावेळी बीपीएफने १२ जागा जिंकल्या होत्या. यावेळी बीपीएफने काँग्रेस आणि एआययूडीएफसोबत आघाडी केली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
191,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा