भाजप उमेदवारांच्या दुसऱ्या यादीतून २५ खासदारांचा पत्ता कट

अनेक नव्या चेहऱ्यांना मिळाली संधी

भाजप उमेदवारांच्या दुसऱ्या यादीतून २५ खासदारांचा पत्ता कट

भाजपने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी ७२ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. यात २५ विद्यमान खासदारांसह नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे.दिल्लीत भाजपने पूर्व दिल्ली मतदारसंघातून हर्ष मल्होत्रा यांना तिकीट दिले आहे. येथे सध्या गौतम गंभीर विद्यमान खासदार आहेत. उत्तर पश्चिम दिल्ली जागेवरून योगेंद्र चंदोलिया यांना उमेदवारी दिली आहे. सध्या या मतदारसंघात हंसराज हंस खासदार आहेत.

पक्षाने जळगावमधून स्मिता वाघ यांना उमेदवारी दिली आहे. येथून विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांचे तिकीट कापण्यात आले आहे. उत्तर मुंबईमधून दोनवेळा खासदार राहिलेले गोपाळ शेट्टी यांच्याऐवजी पियुष गोयल यांना उमेदवारी दिली आहे. तर, अकोला जागेवर विद्यमान खासदार संजय धोत्रे यांच्याऐवजी अनुप धोत्रे यांना उमेदवारी दिली आहे. उत्तर पूर्व मतदारसंघातून मनोज कोटक यांच्याऐवजी मिहीर कोटेचा यांना उमेदवारी दिली आहे. तर, बीडमधून प्रीतम मुंडे यांच्या ऐवजी त्यांची बहीण पंकजा मुंडे यांना उमेदवारी दिली आहे.

गुजरामध्ये पाच नव्या चेहऱ्यांना संधी

साबरकांठा मतदारसंघात दोनवेळा खासदार झालेले दीपसिंह मगन सिंह राठोड यांच्याऐवजी भीकाजी ठाकोर यांना, भावनगर येथून दोनवेळा खासदार झालेल्या भारतीबेन शियाल यांच्याऐवजी निमूबेन बमभानिया यांना, उदयपूर येथून विद्यमान खासादर गीताबेन वाजेसिंह भाई राठवा यांच्या ऐवजी जशुभाई भीलूभाई राठवा यांना तर सूरतमधून तीनवेळा खासदार झालेल्या आणि केंद्रीय मंत्री दर्शना विक्रम जरदोश यांचे तिकीट कापून मुकेशभाई चंद्रकांत यांना मैदानात उतरवण्यात आले आहे.

हरयाणात नवी समीकरणे

हरयाणात भाजपने सिरसा जागेवरून विद्यमान खासदार सुनीता दुग्गल यांच्याऐवजी अशोक तंवर यांना तिकीट दिले आहे. पूर्वाश्रमीच्या काँग्रेसच्या असणाऱ्या तंवर ‘आप’ला सोडून भाजपमध्ये आल्या होत्या. करनालमधून मनोहरलाल खट्टर यांना संधी देण्यात आली आहे. तेथून विद्यमान खासदार संजय भाटिया यांचे तिकीट कापण्यात आले आहे.

हे ही वाचा:

दिल्ली:निवासी इमारतीला आग, चार जणांचा मृत्यू!

पश्चिम बंगाल: शाहजहान शेखच्या ठिकाणांवर ईडीचा छापा!

उत्तर प्रदेशात एनडीएला मिळणार ७७ जागा

‘मंत्री नसतो तर त्यांचे तुकडेतुकडे केले असते’

कर्नाटकमधून पाच चेहरे

कोप्पलमधून दोनवेळा खासदार झालेले संगन्ना कराडी यांचे तिकीट कापून बसवराज क्यावाटोर यांना, बेल्लारीतून व्हाय. देवरप्पा यांच्याऐवजी बी. श्रीरामुलू यांना, कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना हावेरीतून उमेदवारी देण्यात आली आहे. तेथून तीनवेळा खासदार राहिलेले शिवकुमार उदासी यांचे तिकीट कापले गेले आहे. दक्षिण कन्नडमधून तीनवेळा खासदार राहिलेले नलीनकुमार कतील यांच्याऐवजी कॅ. बृजेश चौटा, म्हैसूरमधून दोनवेळचे खासदार प्रताप सिन्हा यांचे तिकीट कापून यदुवीर कृष्णदत्त वाडिया यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर, चामराजनगरमधून सहावेळा खासदार झालेले श्रीनिवास प्रसाद यांच्या ऐवजी एस बलराज यांना उमेदवारी दिली आहे.

मध्य प्रदेशातही तेच

मध्य प्रदेशात भाजपने धार मतदारसंघातून छत्रसिंह दरबार यांच्याऐवजी सावित्री ठाकूर यांना तिकीट दिले आहे. तर, बालाघाट मतदारसंघातून विद्यमान खासदार दलसिंह बिसेन यांच्याऐवजी भारती पारधी यांना तिकीट दिले आहे.

Exit mobile version