हिमाचल निवडणुकीसाठी भाजपचे उमेदवार जाहीर

मुख्यमंत्री जयराम सिराज विधानसभेतून  लढणार

हिमाचल निवडणुकीसाठी भाजपचे उमेदवार जाहीर

हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. मुख्यमंत्री जयराम ठाकूर पुन्हा एकदा सिराज विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. माजी केंद्रीय मंत्री सुख राम यांचा मुलगा अनिल शर्मा यांना भाजपने मंडीतून उमेदवारी दिली आहे. या निवडणुकीत भाजपने माजी मुख्यमंत्री प्रेमकुमार धुमल यांना तिकीट दिलेले नाही.

मुख्यमंत्री जयराम ठाकूर पुन्हा एकदा सिराज विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. माजी केंद्रीय मंत्री सुख राम यांचा मुलगा अनिल शर्मा यांना भाजपने मंडीतून उमेदवारी दिली आहे. जाहीर झालेल्या ६२ उमेदवारांच्या यादीत पाच महिलांनाही तिकीट देण्यात आले आहे. पक्षाने काही विद्यमान आमदारांची तिकिटेही कापली आहेत.

येत्या दोन दिवसांत उर्वरित सहा जागांसाठी भाजप उमेदवारांची नावे जाहीर करेल, असे भाजप नेत्यांनी सांगितले. हिमाचल प्रदेश विधानसभेत ६८ जागा आहेत. पक्षाने एका कॅबिनेट मंत्र्यासह ११ विद्यमान आमदारांना काढून टाकले आहे आणि सुरेश भारद्वाज आणि राकेश पठानिया या दोन मंत्र्यांच्या जागा बदलल्या आहेत. भारद्वाज हे राज्यातील भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत आणि सिमला शहरी मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. त्यांना कसुम्प्टी येथून तर नूरपूरचे आमदार पठानिया यांना शेजारच्या फतेहपूरमधून तिकीट देण्यात आले आहे.

हे ही वाचा:

पीएफआयला राम मंदिर पाडून बाबरी मस्जिद बांधायची होती

पूजा चव्हाणसाठी मी लढत असताना भास्करशेठ तुम्ही कुठल्या बिळात लपला होतात?

रॉजर बिन्नी बीसीसीआयचे नवे अध्यक्ष

पाऊस पुण्यात पुणे पाण्यात

या दिवशी होणार निवडणुका

हिमाचल प्रदेशमध्ये १२ नोव्हेंबरला विधानसभा निवडणुका होणार आहेत. ८ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. राज्य विधानसभेत सध्या भाजपचे ४३ तर काँग्रेसचे २२ सदस्य आहेत. सभागृहात दोन अपक्ष आणि माकपचा एक सदस्य आहे. राज्यात भाजप आणि काँग्रेसमध्ये थेट लढत होण्याची शक्यता आहे. आम आदमी पार्टी (आप) देखील येथे आपले अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे.

Exit mobile version