हरयाणात हॅट्ट्रिक; भाजपाने सलग तिसऱ्यांदा मिळवला विजय

जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्स-काँग्रेस येणार सत्तेत, भाजप २९

हरयाणात हॅट्ट्रिक; भाजपाने सलग तिसऱ्यांदा मिळवला विजय

ज्या निवडणुकांकडे गेले काही दिवस लक्ष लागून राहिले होते, त्या हरयाणा आणि जम्मू काश्मीर या राज्यांच्या निवडणुकांचे निकाल मंगळवारी जाहीर झाले. हरयाणात भाजपने सलग तिसऱ्यांदा सत्ता अबाधित ठेवण्यात यश मिळवले. ९० पैकी भाजपने ४८ जागी यश मिळवले आणि सत्तास्थापनेचा दावा केला.

जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्सने विजय मिळवला. त्यांनी ४९ जागा जिंकल्या तर भाजपला २९ जागी यश मिळाले. भाजपची ही हॅट्ट्रिक होती. या निवडणुकीत भाजप तिसऱ्यांदा निवडून येणार नाही असा कयास बांधला जात होता. एक्झिट पोलमध्ये भाजपचा हरयाणात धुव्वा उडणार असे संकेत होते. निकालाच्या दिवशी सकाळी जे कल जाहीर होत होते त्यात काँग्रेसला मोठी आघाडीही मिळाली होती, पण नंतर भाजपने मुसंडी मारली.

जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसने ४८ जागी यश मिळवले तर पीडीपी या मेहबुबा मुफ्ती यांच्या पक्षाला ३ जागी यश मिळाले. नॅशनल कॉन्फररन्सचे ओमर अब्दुल्ला तिथे मुख्यमंत्री होतील असे जाहीर करण्यात आले आहे.

हे ही वाचा:

हरयाणातील विजयाचा हुंकार देशभर ऐकायला मिळेल!

‘हरियाणातील जनतेचे आभार, जम्मू-काश्मीरमध्ये लोकशाही दिसली’

‘बटेंगे तो कटेंगे’ याचं गांभीर्य समजलं, सनातनींनी योग्य निर्णय घेतला!

वडील, काकांना दहशतवाद्यांनी मारले, पण शगुनने विजय मिळवून दिला रोखठोक संदेश!

भाजपने हरयाणात जबरदस्त यश मिळवले असले तरी त्यांचे १० पैकी ८ मंत्री पराभूत झाले. विधानसभा अध्यक्ष ग्यानचंद गुप्ता देखील पराभूत झाले. काँग्रेसने ३७ जागा जिंकल्या. गेल्यावेळच्या तुलनेत त्यांना ४ जागा जास्त मिळाल्या पण बहुमत त्यांना मिळू शकले नाही. भाजपला या निवडणुकीत ३९.९४ टक्के मते मिळाली तर काँग्रेसला ३९.०४टक्के.

या निवडणुकीत विनेश फोगाटच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष होते. जुलाना मधून विनेशने विजय मिळवला. जम्मू काश्मीरमध्ये आम आदमी पार्टीने आपले खाते उघडत एका जागेवर विजय मिळवला.

Exit mobile version