प्रमोद सावंत यांच्यावर भारतीय जनता पार्टीने पुन्हा एकदा विश्वास दाखवला आहे. गोव्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना दुसरे मुख्यमंत्री बनवण्यास भाजपा पक्षाच्या हायकमांडने सहमती दर्शवली आहे. त्याचवेळी मणिपूरमध्ये बीरेन सिंग यांना प्रदेशाध्यक्ष बनवण्यास भाजपाने सहमती दर्शवली आहे. गोव्यात मुख्यमंत्री बदलले जाण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र आता भाजपाचे मुख्यमंत्री होणार हे स्पष्ट झाले आहे. गोव्यामध्ये भाजपा बहुमतासाठी थोडेसे माघारी पडले पण इतर पक्षांच्या मदतीने भाजपा पुन्हा सत्तेत येणार आहे.
Goa caretaker CM Pramod Sawant and leaders of Goa BJP met PM Narendra Modi today in Delhi.
"Our party is grateful to the people of Goa for blessing us yet again with the mandate to serve the state. We will keep working for Goa’s progress in the times to come," tweets the PM. pic.twitter.com/pNTMznhIcd
— ANI (@ANI) March 16, 2022
प्रमोद सावंत यांनी आज पंतप्रधान मोदींची भेट घेतली. यावेळी पंतप्रधान मोदींनी प्रमोद सावंत यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले आणि गोव्यातील जनतेचे आभार मानले. पंतप्रधान म्हणाले की, गोव्यातील जनतेने भाजपाला दुसऱ्यांदा सेवेचा जनादेश दिला आहे. आता आम्ही गोव्याचा अधिक वेगाने विकास करू.
Met N Biren Singh (Manipur caretaker CM) and congratulated him on BJP's stupendous victory in the recently concluded Assembly Polls. Our Party is committed to working even harder to fulfill the aspirations of the people of Manipur: PM Narendra Modi pic.twitter.com/dhBkmW37hf
— ANI (@ANI) March 16, 2022
त्याचवेळी एन बिरेन सिंग यांनीही पंतप्रधान मोदींची भेट घेतली. पीएम मोदींनी बिरेन सिंग यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले. आणि म्हणाले की, मणिपूर विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि भाजपाला प्रचंड बहुमत मिळाले. आता भाजपा मणिपूरच्या लोकांच्या प्रगतीसाठी आणि विकासासाठी अधिक मेहनत करणार आहे.
गोव्यात कोणत्याही राजकीय पक्षाला पूर्ण बहुमत मिळालेले नाही. भाजपाने गोव्यात इतर मित्रपक्षांच्या मदतीने सरकार स्थापन करण्याचा दावा केला आहे. गोव्यात भाजपाला २० जागा मिळाल्या असून बहुमतापासून एक जागा कमी आहे. म्हणजेच ४० जागा असलेल्या गोव्याला बहुमतासाठी २१ जागांची गरज आहे. त्याचबरोबर काँग्रेसला १२ जागा, टीएमसीला आणि आप ला प्रत्येकी दोन जागांवर समाधान मानावे लागले आहे. तर अपक्षांना चार जागा मिळाल्या आहेत.
हे ही वाचा:
मनसे कार्यकर्त्यांनी आयपीएल खेळाडूंच्या बसची केली तोडफोड
योगी सरकार वाढवणार मोफत रेशनचा कालावधी
….म्हणून रशियाने यूरोप परिषदेतून घेतली माघार!
काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांनीच आयोजित केला ‘द काश्मीर फाइल्स’चा शो
त्याशिवाय मणिपूरमध्ये भाजपने 60 जागांच्या विधानसभेत स्वबळावर बहुमताचा आकडा गाठला आहे. मणिपूरमध्ये भाजपला 32 तर काँग्रेसला केवळ पाच जागा मिळाल्या आहेत.