विखे पाटलांचे संजय राऊतांवर टीकास्त्र
मंत्रिमंडळाचा विस्तार लांबल्यामुळे विरोधकांकडून सरकारवर टीका होत असली तरी ही टीका विकास कामांसाठी नाहीतर हे सत्ता गेल्यानं आलेलं वैफल्य असल्याची टीका भाजपचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यासह विरोधक वारंवार मंत्रिमंडळ विस्तार लांबत असल्याचे वक्तव्य करत आहे. त्यावर बोलताना विखे पाटील म्हणाले, मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत विरोधकांनी चिंता करण्याचे काम नाही. कारण सध्या जनतेला अपेक्षित निर्णय आणि विकास कामे ही मार्गी लागत आहेत. कामांना कुठेही अडसर निर्माण होत नाही.राज्यातील जनतेला अपेक्षित सरकार हे सत्तेवर आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने विकास आता होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
हे ही वाचा:
शाब्बास.. १७ वर्षांखालील जागतिक कुस्तीत सूरज चमकला!
‘कांजूरमार्ग’ मेट्रो स्थानकाची ‘उंच’ भरारी!
भ्रष्टाचारात लडबडलेले पार्थ चॅटर्जी यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी
८ वर्षात ७.२२ लाखांना मिळाल्या नोकऱ्या
अशा वक्तव्यांमुळे आमदार दुरावले
गेल्या काही दिवसांपासून शिंदे आणि भाजपवर सातत्याने टीका करणारे खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधताना विखे पाटील म्हणाले की, शिवसेनेमध्ये केवळ आदेश चालत असला तरी संजय राऊत याला अपवाद आहेत. त्यांचे हायकमांड हे सिल्व्हर ओक आहे. त्यामुळे हे सर्व कुणामुळे होते हे सांगण्याची आवश्यकता नसल्याचे म्हणत त्यांनी राऊतांवर कडक टीका केली. त्याच्याच अशा वक्तव्यांमुळे आमदार दुरावले आणि शिंदे गटात सहभागी झाले.
आता पक्षांचा निकाल लावतील
संजय राऊत यांनी पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचा निकाल लावला पण आता पक्षाचा निकाल लावल्याशिवाय स्वस्त बसणार नाहीत असेही पाटील म्हणाले आहेत. शिवसेनेला स्वतंत्र विचारसरणी होती. मात्र, यांचे हायकमांड बदलल्याने त्यांचा सूरही बदलला असल्याचे आरोप त्यांनी केला आहे. राऊतांची विधाने म्हणजे केवळ करमणूक असून त्याचा आनंद सबंध राज्यातील जनता घेत असल्याचेही पाटील म्हणाले.