नक्की कोण खरं? सरकारी वकील की काँग्रेस?…भाजपाचा सवाल

नक्की कोण खरं? सरकारी वकील की काँग्रेस?…भाजपाचा सवाल

शनिवार, १५ मे रोजी महाराष्ट्रात ऑक्सिजन पुरवठ्यावरून राजकारण तापलेले दिसले. यावेळी काँग्रेसने देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या टीकेला भाजपाने जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. महाराष्ट्र सरकारच्या वकिलांनी उच्च न्यायालयात केलेल्या युक्तिवादाचाच आधार घेत भाजपाने काँग्रेसवर निशाणा साधला आहे. यावेळी ‘नक्की कोण खरं? सरकारी वकील की काँग्रेस?’ असा सवाल भाजपातर्फे विचारण्यात आला आहे.

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहिले आहे. या पत्रातून फडणवीसांनी महाराष्ट्रातील कोरोना परिस्थितीवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आहे. फडणवीसांच्या या पत्रावरून शनिवारी महाराष्ट्राचे राजकारण तापलेले दिसून आले. फडणवीसांचे हे पत्र काँग्रेसला चांगेलच झोंबले. त्यामुळे महाराष्ट्र काँग्रेस पक्षाच्या ट्विटर खात्यावरून फडणवीसांवर निशाणा साधायचा प्रयत्न केला आहे. यात काँग्रेसने केंद्र सरकार महाराष्ट्राला आवश्यक तितका ऑक्सिजनचा पुरवठा करू शकला नाही असे काँग्रेसने म्हटले आहे.

हे ही वाचा:

निवडणूक सरली, आश्वासनं विरली

सकारात्मक: देशातील कोरोना चाचण्या वाढल्या, रुग्णसंख्या घटली

पब्लिक सब जानती है…देवेंद्र फडणवीसांचे सोनिया गांधींना पत्र

कोवॅक्सिनचे उत्पादन १० कोटी डोस प्रतिमहिना पर्यंत वाढवणार

काँग्रेच्या याच टीकेला भाजपाकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले आहे. त्यासाठी भाजपाकडून महाराष्ट्र सरकारच्या वकीलांनी न्यायालयात केलेल्या युक्तिवादाचाच आधार घेण्यात आला आहे. उच्च न्यायलयात राज्य सरकारकडून सांगण्यात आले आहे की राज्याला १७०० मॅट्रीक टन ऑक्सिजनची गरज आहे आणि केंद्र सरकार १७७० मॅट्रीक टन ऑक्सिजन पुरवत आहे. मग नक्की खरं कोण बोलतंय? सरकारी वकील की काँग्रेस पक्ष? असा सवाल भाजपाने केला आहे. त्यासोबतच पीएम केअर्स मधून जानेवारी महिन्यातच महाराष्ट्रात १० ऑक्सिजन प्लांट उभारण्यासाठी निधी मंजूर केला आहे. त्याचे काय केलेत? असा सवालही भाजपातर्फे विचारण्यात आला आहे.

Exit mobile version